धुळे । शिरपूर येथील माजी नगराध्यक्ष प्रभाकर तुकाराम चव्हाण यांच्या घराची झडती आयकर विभागाचे अधिकारी घेत असतांना त्यांच्यासह जमावाने दहशत निर्माण करून शासकीय कामात अडथळा निर्माण करून चिथावणी दिल्यामुळे गर्दीतील लोकांना घरातील अन्य कागदपत्रे सुध्दा गहाळ करून दस्तऐवजातील पुराव्याची हेराफेरी केली. पथकातील महिला अधिकारीचा विनयभंग केल्याची घटना घडली. चव्हाण यांच्यासह 300 ते 400 लोकांच्या जमावाविरूध्द शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. याप्रकरणी चव्हाण हे रविवारी शिरपूर पोलीसांना शरण गेलेत. त्यांना कोर्टांने एका दिवसाची पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
पथकासोबत घातली हुज्जत
दि. 17 रोजी सकाळी 8.15 वाजता आयकर विभागाचे पथक प्रभाकर तुकाराम चव्हाण यांच्या निवासस्थानाची झडती घेण्यासाठी आले होते. मात्र, चव्हाण यांच्या घराला कुलूप होते. ते रात्री 9.15 वाजता घरी परत आल्यावर त्यांना पथक वॉरंट दाखवित असतांना 300 ते 400 लोकांनी पथकासोबत हुज्जत घातली. पथकाने चव्हाण यांना घराचा दरवाजा न उघड्याची सूचना दिली होती. मात्र, चव्हाण यांनी दरवाजा उघडताच एकाने घरात घुसून महत्त्वाचा द्स्ताऐवज पळवून नेला. तसेच जमावाने पथकातील महिला अधिकारीचा विनयभंग केल्याची घटना घडली होती.
शिरपूर कोर्टात हजर
रविवार दि. 21 रोजी प्रभाकर चव्हाण शिरपूर पोलिसांना शरण गेलेत. त्यांना 12 वाजवून 5 मिनीटांनी अटक करण्यात आली. दुपारी 2.30 वाजता शिरपूर कोर्टांत नेले असता न्यायाधिश बी. सी. मोरे यांनी त्यांना एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सहाय्यक आयकर निदेशक स्वप्नील राजाराम सावंत, आयकर अधिकारी विवेक कुमार, आयकरनिरीक्षक शैलेंद्रकुमार, संजय पानसरे, सोनल मॅडम, पोकॉ रियाज शेख, जयश्री चोखा यांच्या पथकाने कारवाईत भाग घेतला होता.
अफवांचा बाजार गरम
आयकर विभागाने चौकशी केल्यानंतर शहरासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अफवांचा बाजार गरम झाल्याचे दिसुन येत आहेत. या नेमक्याकडे इतके सोने, रोख रक्कम तर काहींकडे जमिनीं घेतल्याचे कागदपत्र आढळतील. तसेच इतरांच्या नावे असलेली प्रॉपर्टी मिळाल्याचे कागदपत्रे संबंधित विभागाच्या हाती लागल्याची चर्चा आहे. शिवाय या प्रकरणात अनेकांची बँक खाती, लॉकर सील करण्यात आले आहेत. शहरात यापुढे चौकशीत कोणाचे नाव येईल याबाबत चर्चा होत आहे.