शिरपूरच्या शुभम बाफणांच्या 31 उपवासाची शनिवारी होणार सांगता

0

शिरपूर । वाघाडी गावातील प्रसिद्ध व्यापारी सुनिल बाफना व आई मनिषा बाफना यांचे सुपूत्र शुभम बाफना यांनी वयाच्या 23 व्या वर्षी सलग 31 दिवसापर्यंत फक्त नि फक्त तीन ते चार वेळा कोमट पाण्याचे सेवन करून ऐकतीस दिवसाचे उपवास पूर्ण केले. अनिता बाफना (11) , सुनिता बाफना (16) , कुमारी सिध्दी बाफना (9 ) शोभा राका (9 ) , कुमारी शितल छाजेड (11 ) , कुमारी स्विटी लुणावत ( 9 ) इत्यादींनी उपवास केले. शहरातील जैन नुतन स्थानकात परम पूज्य आचार्य भगवंत 1008 पूज्य श्री रामलालजी म.सा. यांच्या सुशिष्या प.पू.शासन दिपीका पावनश्रीजी म.सा.आदी ठाणा 4 यांच्या उपस्थित बाफना यांच्या उपवासाची सांगता करण्यात येणार आहे. शुभम बाफना यांनी 6 जुलै पासून रोज एक एक दिवसाच्या निरंकट उपवासाची शपथ घेत 31 उपवास पूर्ण केले. 5 ऑगस्ट ( शनिवार ) रोजी त्यांच्या कठीण उपवासाची सांगता होणार आहे. शनिवार रोजी बाफना यांची 31 उपवासाची सांगता जैन नुतन स्थानकात होईल शुभम बाफना हे अशोक बाफना व स्वाभिमान प्रतिष्ठान चे अध्यक्ष विजय बाफना यांचा पुतण्या आहे. आदी तपश्यार्थिचे सकल जैन समाजाने कौतुक केले व याकामी शिरपूर सकल जैन समाज परीश्रम घेत आहे.