शिरपूर: शहरातील बालाजी मंदिराजवळील खालच्या गावातील ८० वर्षीय वृद्धाचा रविवारी 31 रोजी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. वृद्धाचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर २५ मे पासून धुळे येथील हिरे मेडिकलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रविवारी सकाळी वृद्धाचा मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यात कोरोनामुळे मयतांची संख्या ४ झाली आहे.