शिरपूरला पुन्हा कोरोनाचे रुग्ण

0

शिरपूर: शहरात पुन्हा एका ६२ वर्षीय पुरुषाचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. हा व्यक्ती शहरातील काझी नगरातील रहिवासी आहे.
त्यामुळे आता तालुक्यातील रुग्णांची संख्या १० झाली आहे.
तालुक्यातील भाटपुरा येथील ४८ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह मिळून आला होता. त्यापैकी आमोदे येथील तिघे रुग्ण मुक्त झाले आहेत. सध्या अर्थे येथील ४, भाटपुरा येथील १ व शहरातील २ असे ७ रुग्ण उपचार घेत आहेत.आता २ तपासणी अहवाल अद्याप येणे बाकी आहे. पुन्हा १४ जणांचे स्वब घेतले आहेत. त्यामुळे शिरपूर शहर १ दिवस बंद राहणार आहे.