शिरपूर । शिरपूर येथे भाजपा वर्धापन दिवस साजरा करण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या 6 एप्रिल 2017 रोजी 38 वा वर्धापन दिवस विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. प्रथम भाजपा जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी व शहराध्यक्ष हेमंत पाटील, नगरसेवक राजेंद्र गिरासे यांच्याहस्ते भारतमाता, पंडीत दिनदयाल उपाध्याय, डॉ.शामाप्रसाद मुखर्जी यांची प्रतिमा पुजन करण्यात आले.
तद्नंतर जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचे हस्ते कार्यालय परिसरात पक्ष ध्वजारोहन करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष हेमंत पाटील यांच्या पुढाकाराने व संकल्पनेतून देवेंद्र राजपूत या सामान्य व होतकरु व निष्ठावान कार्यकर्त्याला सीटी – 100 ही मोटार सायकल जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्याहस्ते देण्यात आली. बबनराव चौधरी यांनी भाजपाची स्थापनेचा इतिहास सांगितला.
माहितीपत्रकाचे प्रकाशन
याप्रसंगी प्रधानमंत्री आवास योजनेचा शहर भाजपा तर्फे काढण्यात आलेल्या माहितीपत्रक जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जिल्हाउपाध्यक्ष किशोर माळी, तालुकाध्यक्ष राहूल रंधे, जिल्हाचिटणीस चंद्रकांत पाटील, संजय आसापूरे, शहर सरचिटणीस महेंद्र पाटील, शहर उपाध्यक्ष प्रशांत चौधरी, तालुका उपाध्यक्ष सुरेंद्र राजपूत, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष हेमराज राजपूत, शहराध्यक्ष विक्की चौधरी, भाजपा अल्पसंख्यांक जिल्हा सरचिटणीस मुबीन शेख, जिल्हा चिटणीस जाकीर तेली, शहराध्यक्ष अरमान मिस्तरी, व्यापारी आघाडी शहराध्यक्ष नंदु माळी, भाजपा शहर चिटणीस रहीम खाटीक , राधेश्याम भोई, अविनाश शिंपी, प्रविण पाटील, जयवंत सरदार, विपूल बिचवे, संदिप करंके, शिसाका माजी संचालक जयवंत पाटील, मनोज महाजन, भटू माळी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हेमंत पाटील यांनी तर आभार संजय आसापूरे यांनी मानले.