शिरपूरातील आदर्श नगरातील उर्वरीत अतिक्रमणावरही अखेर हातोडा

0
शिरपूर : शहरातील आदर्श नगरातील अतिक्रमण न्यायालयाच्या आदेशाने दोन दिवसांपूर्वी हटवण्यात आले तर या कारवाई विरोधात विस्थापीतांनी नगर परीषदेच्या प्रवेशद्वाराबाहेर बिर्‍हाड आंदोलन सुरू केले.
शनिवांरी सकाळी 10 वाजेच्या सुमारास प्रचंड पोलीस बंदाबस्तात उपजिल्हा रुग्णालयाच्या भिंतीला लागून असलेल्या आदर्श नगरातील अतिक्रमणावर जेसीबी फिरवण्यात आल्याने अतिक्रमितांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत संतापही व्यक्त केला.  दरम्यान, अतिक्रमितांना नगरपरीषदेतर्फे कळमसरे येथील पर्यायी जागा सूचविण्यात आली असलीतरी ती शहरापासून लांब असल्याने या जागेस विरोध करण्यात आला आहे.