शिरपूर । धुळे जिल्हा पोलिस दल बालकल्याण समिती व जिल्हाबाल संरक्षण कक्ष यांच्या वतीने ऑपरेशन स्माईल 2017 ही मोहिम राबविण्यास सुरुवात झाली आहे. शिरपूर शहरातील करवंद नाका व निमझरी नाका परिसरातील विविध हॉटेलवर काम करणार्या बालकामगारांची तेथुन मुक्तता करुन त्यांना त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. शहरातील अनेक हॉटेलींवर लहान मुले हे काम करत आहेत. याबाबत दै.जनशक्तीने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानुसार ऑपरेशन स्माईल अंतर्गत कारवाई करत 14 बालकामगारांची सुटका करण्यात आली आहे. या बालकामगारांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले.
आधारकार्डाच्या नोंदीनुसार दिले वडिलांच्या ताब्यात
ही मोहिम पोलिस अधिक्षकएम.राम कुमार अप्पर पोलिस अधिक्षकविवेक पानसरे, उपपोलिस अधिक्षकहिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु झाले असून पतखात जिल्हा बालसंरक्षण कार्यालय अधिकारी रत्ना वानखेडेकर, संरक्षण अधिकारी संगिता पाटील, कायदा वपरिवीक्षा अधिकारी गायत्री भामरे यांचा पथकाने शिरपूर शहरातील करवंद नाका व निमझरी नाका परिसरातील विविध हॉटेलवर काम करणार्या 14 बाल कामगारांची सुटका केली. त्यांना त्यांच्या आधारकार्डाच्या मदतीने आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. पुन्हा त्यांना बालकामगार म्हणून कोठेही काम करु देवू नका अशी समज देण्यात आली. तर ज्या हॉटेलवर ते काम करतांना मिळून आले ते हॉटेल मालकांना देखील पुन्हा यांना कामावर ठेवू नये अशी समज देण्यात आली.