शिरपूर । येथे जन्माष्टमीनिमित्त विविध शाळांमध्ये दहीहंडीचे आयोजन करण्यात आले. यात शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा व महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी कृष्णाच्या वेशभुषेत तर विद्यार्थिनी राधेच्या वेशभुषेत हजर होते.
शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळेत मा.नगरसेवक दिलीप बोरसे ,पालक प्रतिनिधी भूषण पाटील, सुनिल साळुंखे, विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी.पाटील, शिक्षक आदी उपस्थित होते. बालवाडी वर्गातील छोट्या बालमित्रांनी श्रीकृष्णाची वेशभूषा सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. प्रास्ताविक सी.डी. पाटील यांनी तर. सूत्रसंचालन महेंद्र माळी यांनी केले. यशस्वीतेसाठी जगदीश सोलंकी,संदीप चौधरी, अविनाश राजपूत, गोपाल न्हावी,प्रकाश ईशी, गजेंद्र जाधव, रमेश शिरसाठ, जगदीश धनगर,योगेश बागुल, शुभांगी बाविस्कर, संगिता चव्हाण, अर्चना जोशी,व्ही.डी तांबोळी यांनी कामकाज पाहिले. चित्ररंगभरण स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत 865 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला
फुले विद्यालयात पर्यावरणपूरक दहिहंडी
महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात एन.सी.सी व राष्ट्रीय हरित सेना विभागातर्फे पर्यावरणपूरक दहिहंडी चा कार्यक्रम आयोजित केला होता. दहिहंडीचे पूजन विद्यालयाचे मुख्याध्यापक आर.पी.अढ़ावे व उपमुख्याध्यापिका सौ.जोशी मैडम यांच्या हस्ते करण्यात आले. या दहीहंडीचे वैशिष्ट म्हणजे या उत्सवात पाण्याचा वापर न करता तसेच मानवी मनोरा न करता शारीरिक इजा न होता हा कार्यक्रम संपन्न झाला. कमलेश पावरा याने दहीहंडी फोडून त्याला एन.सी.सी. विभागातर्फे ढाल,दोन सामान्यज्ञानाची पुस्तके विद्यालयाचे मुख्याद्यापक आर.पी.अढावे यांच्या हस्ते देण्यात आले. या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू भगिनी यांचे सहकार्य लाभले.