शिरपूर काँग्रेसच्या नगरसेविकांचे जिल्हाधिकार्‍यांनी अपील फेटाळले

0

शिरपूर। शिरपूर वरवाडे नगर परिषदेची पंचवार्षिक निवडणूक नोव्हेंबर 2016 मध्ये झाली. या निवडणूकीत भाजपाचे 4, भाजपा पुरस्कृत 3, अपक्ष 2 असे 9 नगरसेवक काँग्रेस विरोधी निवडूण आले असून निवडणूकीनंतर या 9 नगरसेवकांनी एकत्र येवून गट स्थापन केला. या कारणावरून या 9 नगरसेवकांना अपात्र ठरविण्यात यावे असे काँग्रेसच्या 2 नगरसेविकांनी जिल्हाधिकार्‍यांकडे अपील दाखल केले होते. यामुळे गेल्या सहा ते सात महिन्यांपासून या 9 नगरसेवकांवर टांगती तलवार होती. मात्र जिल्हाधिकार्‍यांनी दोघ बाजूंचे म्हणने ऐकून घेतल्यावर कायद्यानूसार या 9 नगरसेवकांना पात्र ठरविले असून काँग्रेसच्या नगरसेविकांचे अपील फेटाळून लावले असल्यामुळे काँग्रेसचे धाबे दणाणले आहे.

नोव्हेंबर 2016 मध्ये झाल्या होत्या निवडणुका
नोव्हेंबर 2016 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत भाजपाचे मोहन पाटील, हेमंत पाटील, राजेंद्रसिंग गिरासे, मोनिका शेटे , पुरस्क्रृत रोहित रंधे, चंदनसिंग राजपूत, सुलोचना साळूंके, अपक्ष किरण दलाल, दिपक माळी यांनी निवडणूकीनंतर एकत्र येत जिल्हाधिकारी यांच्याकडे गट स्थापन करण्याचे पत्र दिल्यानुसार विरोधी नगरसेवकांच्या एकत्रीस गटास मान्यता जिल्हाधिकार्‍यांनी दिली होती. याला विरोध करत काँग्रेसच्या नगरसेविका अरूणा थोरात व उज्वला अहिरे यांनी निवडणूक कायद्याचा भंग झाल्याचा अर्ज जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला होता. जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्ट नुकताच या अपीलाचा निकाल जाहिर केला असून काँग्रेसच्या नगरसेविकांचा अपील फेटाळून लावत 9 नगरसेवक पात्र असल्याचा निकाल दिला. या निकालानंतर भाजपा जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक बबनराव चौधरी यांच्या निवासस्थानी सर्व 9 नगरसेवकांची बैठक घेवून जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक मोहन पाटील, भाजपा जिल्हा सरचिटणीस अरूण धोबी, नगरसेवक हेमंत पाटील, नगरसेवक राजेंद्रसिंग गिरासे, नगरसेविका मोनिका शेटे, सुलोचना साळूंके, नगरसेवक रोहीत रंधे, चंदनसिंग राजपूत, किरण दलाल, दिपक माळी, भाजपा शहर उपाध्यक्ष रोहीत शेटे , प्रशांत चौधरी आदी उपस्थित होते.