शिरपूर ग्रामीणमध्ये २ कोरोना पॉझिटिव्ह

0

एसआरपी जवानाची पत्नी, मुलगी, आई, वडील कोरोना पॉझिटिव्ह

शिरपूर: तालुक्यातील अर्थे येथील एसआरपी जवानाला मालेगाव येथे ड्युटीला असताना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याची पत्नी व मुलगी दोघीचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. हे दोन्ही अर्थे येथे आलेले होते. अर्थे गाव व परिसर संपूर्ण कंटेंटमेंटझोन जाहीर करण्यात आला होता. त्यांच्या संपर्कातील नागरिकांना होम कोरोनंटाईन त्यांचे कोरोना तपासणीसाठी नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी आलेल्या रिपोर्टनुसार एसआरपी जवानाचे आई आणि वडील हेही कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत.यामुळे आता शिरपूर तालुक्यामध्ये सात कोरोना रुग्ण झाल्याने शिरपूर ग्रामीण भागात धोक्याची घंटा वाजू लागल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.