शिरपूर । माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल व आमदार काशिराम पावरा यांच्या प्रयत्नाने शिरपूर तालुक्यातील विविध रस्ते व आदिवासी आश्रमशाळांमध्ये मुलींच्या वस्तीगृहांच्या बांधकामासाठी एकूण 15 कोटी 38 लाख 79 हजार रुपयांचा निधी अर्थसंकल्पात मंजूर झाला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली विकासकामे सतत सुरु आहेत. राज्यशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्ता दुरूस्ती, मजबुतीकरण, डांबरीकरण यासाठी या निधींचा वापर करण्यात येणार आहे.
या कामांचा समावेश : यात बोराडी जातोडे-बाळदे-गिधाडे-सुकवदतेराचे मजबुतीकरण व दोन वर्षां करीता देखभाल, दुरुस्ती करण्यासाठी (भागवाघाडी ते गिधाडे) 2 कोटी 88 लाख 12 हजार रुपये, बोराडी-नवीबोराडी-उमर्दे-वकवाड-पळासनेर रस्तामध्ये मजबुतीकरण व दोन वर्षां करीता देखभाल, दुरुस्तीकरण्यासाठी (भागबोराडी ते पळासनेर) 2 कोटी 49 लाख 96 हजार रुपये, अमलाड-मोडबोरद-शहादा-मालकातर रस्तामध्ये मजबुतीकरण व डांबरीकरण तसेच दोन वर्षांकरीता देखभाल, दुरुस्तीकरण्यासाठी 2 कोटी 96 लाख 71 हजार रुपये असे सार्वजनिक बांधकाम विभागाकडील कामांसाठी एकूण 8 कोटी 34 लाख 79 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.यासोबतच बोराडी-उमर्दे-पळासनेर रस्ता प्रजिमा-5 कि.मी. 7/500 ते 10/500 चीसुधारणा करण्यासाठी25 लाखरुपये, सुळे- रोहिणी-भोईटी रस्ता प्रजिमा-8 वरस्लॅबड्रेनचे / ढापाड्रेनचे बांधकाम करण्यासाठी 50 लाख रुपये आदी विकासकामे होणार आहे.
मुलींचा वसतीगृहासाठी साडेचार कोटींचा निधी
आदिवासी आश्रमशाळा इमारतींमध्ये मुलींच्या वस्तीगृहांच्या बांधकामासाठी शिंगावे येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेत मुलींच्या वसतीगृहांच्या बांधकामासाठी 1 कोटी 99 लाख रुपये, शिंगावे येथीलच शासकीय आदिवासी आश्रमशाळेत मुलींच्या वस्तीगृहांच्या बांधकामासाठी (क्षमता-125) 2 कोटी 50 लाख रुपये असे एकूण 4 कोटी 49 लाख रुपयांचा आर्थिक निधी मंजूर करण्यात आला आहे.