शिरपूर तालुक्यातील रस्त्यांसाठी 18.75 कोटींचा निधी मंजूर

 

 

 

शिरपूर(प्रतिनिधी) धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अमरिशभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नाने अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर शहादा-शिरपूर रस्त्यासाठी विशेष दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत 5 कोटी 45 लक्ष रुपयांचा व तालुक्यातील रस्त्यांसाठी 18.75 कोटींचा निधीआ.अमरिशभाई पटेल व आ.काशिराम पावरा भरघोस निधी मंजूर झाला आहे.

शिरपूर शहादा रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नाने अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर शिरपूर शहादा रस्त्यासाठी विशेष रस्ते दुरुस्ती निधी मंजूर करण्यात आला असून पुढील आठवड्यात या रस्त्याचे काम सुरू होणार आहे. आमदार अमरिशभाई पटेल यांच्या प्रयत्नामुळे पुढील वर्षी म्हणजेच एक वर्षानंतर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग कडे ट्रान्सफर केला जाणार आहे.तसेच माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांच्या अथक प्रयत्नाने महाराष्ट्र शासनाच्या पुरवणी अर्थसंकल्प डिसेंबर 2021 मध्ये शिरपूर तालुक्यात विशेष रस्ते दुरुस्ती कार्यक्रम, आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रातील विविध रस्त्यांसाठी एकूण 18 कोटी 75 लक्ष रुपयांचा भरघोस आर्थिक निधी मंजूर झाला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील विकासकामांची घोडदौड सातत्याने सुरु आहे.

माजी शिक्षण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व शिरपूर तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांनी सातत्याने पाठपुरावा करून आतापर्यंत भरघोस निधी मंजूर करून आणला आहे.

 

तालुक्यातविशेष दुरुस्ती कार्यक्रम अंतर्गत तळोदा, प्रकाशा, शहादा, शिरपूर रस्ता रा. मा. 4 किमी 62/030 ते 77/700 मध्ये वार्षिक देखभाल दुरुस्ती करणे ता. शिरपूर जिल्हा धुळे साठी 1 कोटी 99 लक्ष रुपये निधी मंजूर झाला आहे. तळोदा, प्रकाशा, शहादा, शिरपूर रस्ता रा. मा. 4 किमी 77/700 ते 86/530 मध्ये वार्षिक देखभाल दुरुस्ती करणे ता. शिरपूर जिल्हा धुळे साठी 1 कोटी 99 लक्ष रुपये निधी मंजूर. रा. मा. – 3 मार्ग ते गलंगी फाटा रा. मा. – 4 किमी 94/530 ते 116/065 मध्ये वार्षिक देखभाल दुरुस्ती करणे ता. शिरपूर जिल्हा धुळे साठी 82 लक्ष रुपये असे विशेष दुरुस्ती कार्यक्रम अंतर्गत 4.80 कोटी रुपये मंजूर झाले आहेत

 

———–

तालुक्यात बिगर आदिवासी क्षेत्रातील

 

तालुक्यात बिगर आदिवासी क्षेत्रातील शहादा, सांगवी, हातेड रस्ता रा. मा. – 1 किमी 85/00 ते 87/00 मध्ये सुधारणा करणे (बोराडी गावाजवळील लांबी) साठी 2 कोटी रुपये मंजूर. शहादा, सांगवी, हातेड रस्ता रा. मा. – 1 किमी 104/330 ते 110/00, 112/00 ते 113/740 व 118/00 ते 121/00 मध्ये सुधारणा करणे (जोयदा ते खंबाळे, खामखेडा ते सत्रासेन फाटा) साठी 3 कोटी 70 लक्ष रुपये मंजूर. तसेच रा. मा. – 3 ते पळासनेर हाडाखेड जामफळ रस्ता रा. मा. 1 अ किमी 00/00 ते 00/950 मध्ये काँक्रीटीकरण करणे व किमी 0/950 ते 3/00 मध्ये सुधारणा करणे ता. शिरपूर (भाग पळासनेर गावातील लांबी व हाडाखेड ते सुळे) साठी 2 कोटी रुपये मंजूर, असे बिगर आदिवासी क्षेत्रासाठी एकूण 7 कोटी 70 लक्ष रुपये मंजूर झाले आहेत.

——–

आदिवासी क्षेत्रासाठी

 

तालुक्यात आदिवासी क्षेत्रासाठी एकूण 5.60 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यात बोराडी, न्यू बोराडी, उमर्दे, वकवाड, पळासनेर रस्ता प्रजिमा 5 किमी 1/800 वर लादीमोरीचे बांधकाम करणे साठी 10 लक्ष रुपये मंजूर. बोराडी, न्यू बोराडी, उमर्दे, वकवाड, पळासनेर रस्ता प्रजिमा 5 किमी 4/500 वर पुलास संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे साठी 10 लक्ष रुपये मंजूर. बोराडी, न्यू बोराडी, उमर्दे, वकवाड, पळासनेर रस्ता प्रजिमा 5 किमी 8/200 वर लादीमोरीचे बांधकाम करणे साठी 10 लक्ष रुपये मंजूर. बोराडी, न्यू बोराडी, उमर्दे, वकवाड, पळासनेर रस्ता प्रजिमा 5 किमी 8/400 वर लादीमोरीचे बांधकाम करणे साठी 10 लक्ष रुपये मंजूर. प्रजिमा 5 मोहिदा ते बटवापाडा रस्त्याचे नूतनीकरण करणे 10 लक्ष रुपये मंजूर. बोराडी, झेंडेअंजन, पनाखेड रस्ता प्रजिमा-6 किमी 5/800 ते 10/00 मध्ये रुंदीकरणासह डांबरीकरण करणे 10 लक्ष रुपये मंजूर. हाडाखेड रा.मा. 3 पासून रस्ता ग्रा.मा. 116 किमी 0/0 ते 5/0 चेेे बांधकाम करणे 70 लक्ष रुपये मंजूर. रा. मा. – 4 ते तोंदे रस्ता बांधकाम करणे ग्रा. मा. 11 किमी 00/00 ते 2/00 साठी 70 लक्ष रुपये मंजूर. बोराडी ते निमझरी रस्ता इजिमा 39 किमी 0/500 ते 7/00 चे बांधकाम करणे साठी 70 लक्ष रुपये मंजूर. सुळे ते नटवाडे रस्ता ग्रा. मा. 79 किमी 0/00 ते 2/500 मध्ये बांधकाम करण्यासाठी 70 लक्ष रुपये मंजूर. कोडीद ते सामऱ्यादेवी रस्ता ग्रा.मा. 136 किमी 3/00 ते 8/00 मध्ये बांधकाम करण्यासाठी 70 लक्ष रुपये मंजूर. चोंदी ते उमरदे रस्ता ग्रा.मा. 22 किमी 1/00 ते 3/00 बांधकाम करण्यासाठी 50 लक्ष रुपये मंजूर. बोराडी, वाडी, वाघाडी रस्ता प्रजिमा-2 रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी 50 लक्ष रुपये मंजूर. निमझरी ते वरझडी रस्ता ग्रा.मा. 117 चे बांधकाम करण्यासाठी 50 लक्ष रुपये मंजूर.

 

तालुक्यातील रस्त्यांसाठी 18 कोटी 75 लक्ष रुपयांचा भरघोस आर्थिक निधी माजी शिक्षण मंत्री आ. अमरिशभाई पटेल व आ.काशिराम पावरा यांच्या प्रयत्नाने मंजूर झाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे.