शिरपूर। तालुक्यातील सलाईपाडा (बोराडी) येथे बौध्द पौर्णिमेच्या दिवशी विश्वज्ञान विपश्यना केंद्राचे भुमिपूजन गावातील आदिवासी कुटूंबातील भाईलाल पावरा यांच्याहस्ते करण्यात आले. सदर विश्वज्ञान विपश्यना केंद्र उभारणेसाठी सलाईपाडा यांनी स्वमालकीची एकूण आठ एकर जमिन केंद्रास दान दिली.
सदर विपश्यना केंद्र बुध्द धम्म प्रचार व प्रसार बाबत संकल्पना साकारणारे किरण सोनवणे (मुंबई) यांच्या अथक प्रयत्नाने भुमिपूजन करण्यात आले. सातपुडा पर्वत रांगेत वसलेले गाव सलाईपाडा येथे इगतपुरीच्या विपश्यना केंद्राच्या ढाचा प्रमाणे विपश्यना केंद्र उभारण्यात येणार आहे. एन.जी.ओ. मार्फत वृक्ष लागवड, जलसंवर्धन , दारुबंदी, अंधश्रध्दा, आरोग्य विषयक जनजागृती करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रामास प्रमुख पाहूणे डॉ.सुनिल पानपाटील, नंदलाल बैसाणे, पवार , अनिल शिरसाठ, संतोष कुंवर, राहूल रायसिंग, महादु पाटील, राजाराम भालसे, विश्वनाथ कुंवर, जगदिश पावरा आदी उपस्थित होते.