शिरपूर तालुक्यातील 28 दारूंच्या दुकानांना सील

0

शिरपूर। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशावरून शिरपूर तालुक्यातील 500 मिटरच्या आत असलेल्या महामार्गालगतच्या 18 परमीट रूम, 6 बिअरशॉप व 4 देशी असे एकूण 28 दारूचे दुकानांना सील करण्यात आले. कायदेशीररित्या हे दुकाने बंद झाली असली तरी तालुक्यात बेकायदेशीर चालणार्‍या अनेक दारू दुकानांची यामुळे चांदी झाली आहे. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर 1 एप्रिल रोजी नियमात बसणार्‍या दुकानातील साठा जप्त करून त्याची नोंद साठा रजिष्ठरमध्ये संबंधीत विभागाकडून करण्यात आली.

यामुळे व्यसनाधीन लोकं अवैध दारू दुकानांकडे वळत असल्यामुळे अव्वाच्या सव्वा दराने त्यांना दारू त्याठिकाणी उपलब्ध केली जात आहे. तालुक्यातील हॉटेल किसन, हॉटेल अंजली वरूळ, हॉटेल ममता अर्थे, हॉटेल राज शिंगावे, हॉटेल आकाश शिंगावे, हॉटेल मानस शिरपूर, हॉटेल साहेबा मांडळ, हॉटेल पापा मांडळ, हॉटेल सिंधपंजाब आमोदा, हॉटेल आशा आमोदा, हॉटेल चेतन, हॉटेल निला दहिवद, हॉटेल गुरमोहर दहिवद, हॉटेल जायका, मराठा दरबार, धरती गार्डन होळनांथे, हॉटेल प्रिन्स बोराडी, हॉटेल विशाल हे 18 परमीटरूम बंद करण्यात आले असून यासह 6 बिअरशॉप व 4 देशी दारूचे दुकान बंद करण्यात आले आहेत.