शिरपूर तालुक्यात आठ ग्रामपंचायत मध्ये चुरशीची लढत

0

तालुक्यातील एक ग्रामपंचायत बिनविरोध तर एका ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य बिनविरोध
शिरपुर – शिरपुर तालुक्यात दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत बुधवारी उमेदवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस होता. शेवटच्या दिवशी दहा ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी 23 तर सदस्य पदासाठी 83 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. माघारीनंतर पिंप्री ग्रामपंचायतीची सरपंचासह संपूर्ण ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध झाली आहे. तर पिळोदा ग्रामपंचायतीत संपूर्ण नऊ सदस्य बिनविरोध झाले आहेत. येथे फक्त सरपंच पदासाठी निवडणूक होत आहे. दहा ग्रामपंचायतीत एकूण 31 सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत. तर रुदावली ग्रामपंचायतीत अनुसूचित जमातीच्या दोन जागा रिक्त राहिल्या आहेत. आता रिंगणात असलेल्या सरपंच व सदस्य पदांची निवडणूक 24 फेब्रुवारी रोजी होणार आहे. नऊ ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी 28 तर सदस्य पदासाठी आठ पंचायतीत एकशे पंचवीस उमेदवार रिंगणात आहेत.

बिनविरोध पिंप्री ग्रामपंचायत
पिंप्री ग्रामपंचायतीत प्रविणसिंग रामकृष्ण राजपूत हे सरपंच पदासाठी तर सदस्य पदासाठी काशिनाथ दला भिल, कमलबाई संजय कोळी,संजय सरदार धनगर, इंदुबाई उमेशसिंह राजपूत, आरती प्रवीण भिल, वंदनाबाई रणजीत गिरासे, महेंद्र एकनाथ गिरासे हे बिनविरोध निवडून आले. अहील्यापुर 1, तर्‍हाडी 1, पिंप्री 7, भोरटेक 1, सावेर-गोदी 5, वनावल 1, वाडी 6, पिळोदा 9

बिनविरोध निवडून आलेले सदस्य
अहिल्यापुर – कमलबाई नाना शिरसाठ, तर्‍हाडी– उजनबाई वासुदेव अहिरे, भोरटेक– मच्छिंद्र बळीराम जाधव, सावेर गोदी – गोटू उखा तायडे, अन्नपूर्णाबाई अशोक शिरसाठ, पापालाल रामसिंग राठोड, द्वारकाबाई सिताराम वंजारी, शिलाबाई सोनसिंग चव्हाण, वनावल- उत्तम दंगल महिरे, वाडी बु- मिनाबाई विजय भिल, सविता गोपाल गुजर, अनिता जितेंद्र पाटील, केवलसिंग रूपसिंग राजपूत, नामदेव श्रावण चौधरी, कमलबाई अमृत बैसाणे.

संपूर्ण सदस्य बिनविरोध
पिळोदा ग्रामपंचायतीच्या योगेश सुधाकर बोरसे, हेमलता संतोष पाटील ,रामकृष्ण नागो कोळी, सुनिता सुनिल पाटील, उषाबाई लक्ष्मण पाटील, नगीनदास बाजीराव पाटील, अनिल बारकू भिल, मिराबाई भाईदास भिल, गौतमाबाई भिका भिल यांचा समावेश आहे.