मृतांची संख्या 9
एकाच दिवशी 13 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह
शिरपूर: तालुक्यात कोरोना बाधितांनी शतक पूर्ण केले आहे. शुक्रवारी, 12 रोजी प्राप्त अहवालानुसार 13 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. यामुळे शिरपूर तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या आता 101 वर जाऊन पोहचली आहे. 12 रोजी सायंकाळी वैद्यकीय महाविद्यालयात शिरपूर शहरातील 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यानंतर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील आणखी 5 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. आता रात्री शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात आणखी तीन रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. एकाच दिवशी 13 रुग्ण पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
शिरपूर तालुक्यात एकाच दिवसात 13 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात 31 वर्षाची महिला योगेश्वर कॉलनी, 27 वर्षाचा पुरुष गोविंद नगर, 45 वर्षाचा पुरुष प्रोफेसर कॉलनी, 52 वर्षाचा पुरुष प्रोफेसर कॉलनी, 22 वर्षाची महिला गणेश कॉलनी, यशवंत शाळेजवळ 1 पुरुष, वरवाडे येथे 4 वर्षाचा 1 मुलगा, सुभाष कॉलनी 1 पुरुष, आदर्श नगर 1 पुरुष, अंबिका नगर 1 पुरुष, सुभाष कॉलनी, 46 वर्षाचा पुरुष पाटील वाडा, 72 वर्षाचा पुरुष शिंपी गल्ली यांचा समावेश आहे. त्यामुळे शिरपूरात आतापर्यंत कोरोनाची संख्या 101 वर तर मृतांची संख्या 9 इतकी आहे.
Next Post