शिरपूर । तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वर्हाड कसबे येथील सतिलाल रामदास कोळी (वय 25) यांना सर्पदंश झाल्याने त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. रूग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. शिरपूर पोलीस स्टेशनला वॉर्डबॉय अशोक बिरारी यांनी खबर दिली.
तर दुसर्या घटनेत वाघाडी-बोराडी रस्त्यांवर काली-पिली प्रवासी वाहतुक करणार्या गाडीवर झाड पडल्याने गाडीत बसलेल्या हरसिंग बालसिंग पावार(वय 32) हा गंभीर जखमी झाले होते. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत वार्डबॉय बी. डी. बोरसे यांनी शिरपूर पोलीस स्टेशनला खबर दिली. दोघ घटनांच्या शिरपूर पोलीस स्टेशनमध्ये वेगवेगळ्या आकस्मित मृत्यू दाखल करण्यात आला आहे.