शिरपूर-दहिवेल बसमधून महिलेचे दागिने लांबविले

0

शिरपूर। साक्री तालुक्यातील निजामपूर येथील वृध्द महिला शिरपूर-दहिवेल बसमधून घरी जाण्यासाठी निघाली असतांना अज्ञात चोरट्याने कापडी पिशवीतून सोने, चांदी व रोख रक्कम असे 50हजार रुपयांचा ऐवज जोरुन नेल्याची घटना 7 रोजी दुपारी 3 वाजता अंजताबाई चिंधू सोनवणे-शिंपी रा. निजामपूर ता. साक्री ही वृध्द महिला शिरपूर बसस्थाकावरुन गावी जाण्यासाठी शिरपूर-दहिवेल बसमध्ये बसली.

सध्याकाळी 7 वाजता घरी पोहचल्यावर त्यांनी कापडी पिशवीतील दागिने पाहिले असता ते मिळून आले नाहीत. पिशवीत 40 हजार रुपया किंमतीचे 2 तोळे वजनाची सोन्याची मंगलपोल, 3 ग्रॅम वजनाचे कर्णफुल, चांदीचे दागिनेसह रोख 4 हजार रुपये असे 50 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली. महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.