शिरपूर नगरपालिकातर्फे शहरात 14 हजार डस्टबीन वाटप

0

शिरपूर । स्वच्छ सर्वेक्षण-2018 अंतर्गत शिरपूर वरवाडे नगर परिषदेतर्फे ओला व सुका कचरा विलगीकरण मोहीम हाती घेण्यात आली असून शहरातील वाल्मिक नगर येथे लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरुपात डस्ट-बीन वाटप करण्यात आले. शहरातील वाल्मिक नगर येथे गुरुवार दि. 16 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता प्रातिनिधीक स्वरुपात डस्ट-बीन वाटप कार्यक्रम घेण्यात आला. संपूर्ण शहरभरात 14 हजार डस्टबीन घरपोच तसेच हॉटेल, नाश्टा रेस्टॉरंट व खानावळी येथे 500 डस्ट-बीन वाटप करण्यात येणार आहे. याप्रसंगी अमरिशभाई पटेल, सीबीएसई स्कूलच्या विद्यार्थी-विद्यार्थिंनींनी स्वच्छतेवर आधारित दोन पथनाटयांचे सादरीकरण केले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमास व्यासपीठावर लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, शिरपूर टेक्सटाईल पार्क चेअरमन तथा नगरसेवक तपनभाई पटेल, माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक प्रभाकरराव चव्हाण, नगरसेवक बबनराव चौधरी, बांधकाम सभापती संगिता देवरे, पाणी पुरवठा सभापती छाया ईशी, शिक्षण सभापती आशा बागुल, नगरसेविका वैशाली देवरे, नगरसेविका हेमलता गवळी, माजी उपनगराध्यक्ष वासुदेव देवरे, मुख्याधिकारी निवृत्ती नागरे, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी, नगर अभियंता माधवराव पाटील, डॉ. मनोज निकम, नगरसेवक देवेंद्र राजपूत, नगरसेवक हर्षल गिरासे, नगरसेवक गणेश सावळे, पिंटू शिरसाठ, इर्फान मिर्झा, सलिम खाटीक, शामकांत ईशी, चंद्रकांत कोळी, बापू थोरात, सुरेश अहिरे, संतोष माळी आदी कर्मचारी उपस्थित होते.

यशस्वितेसाठी यांनी केले प्रयत्न
प्रास्ताविकात प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी यांनी शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण-2018 बद्दल सविस्तर माहिती देवून नागरिकांना सुका व ओला कचरा स्वतंत्रपणे डस्टबीनमध्ये टाकून घंटागाडीतच टाकावा. घरी असलेली जुनी डस्टबीन व नगर परिषदेतर्फे मिळणारी दुसरी डस्टबीन या दोन्हींचा वापर यासाठी करायचा आहे. तसेच वैयक्तिक शौचालयाचा नियमित वापर करायचा आहे. ज्यांच्याकडे नाहीत अशा व्यक्तींनी सार्वजनिक शौचालयांचा वापर करु नये, अन्यथा शासनाच्या आदेशानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल.