शिरपूर पंचायत समितीचा अस्वच्छ कारभार

0

शिरपूर। तालुक्यातील बलकुवा ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सरोज धेांडू पाटील यांनी आज पासुन शिरपूर पंचायत समिती कार्यालया समोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. या पुर्वी दि.31 रोजी दिलेल्या निवदेनात त्यांनी आपल्या रास्त मागण्या पंचायत समिती शिरपूरच्या गट विकास अधिकार्‍यांना लेखी पत्रान्वये सादर केल्या होत्या. मात्र त्या अनुशंगाने कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे आज गावकरी व डॉ.पाटील यांनी आपल्या उपोषणास सुरुवात केली आहे. निवेदनात गावकर्‍यांनी बलकुवा ग्रृप ग्रामपंचयतीत सन.2014 – 2015 मध्ये वैयक्तीक शौचालयासाठी मिळालेले अनुदान चा लाभ हा 258 लाभार्थ्यांना न मिळता पंचायत समितीचे अधिकारी आणी कर्मचारी यांनी संगनमतोन लटल्याचा आरोप करण्यात आला आहे.

अधिकार्‍यांनी अनुदान लाटले
वैयक्तीक शौचायलयाचे लाभार्थी लाभापासुन वंचित असून आम्हांस आमचा लाभ मिळणुन द्यावा ही विनंती करण्यात आली आहे. शिवाय भ्रष्ट्र ग्रामसेवक व संबधित विस्तार अधिकारी व कर्मचारी व वरीष्ठ अधिकार्‍यांनावर कार्यवाही होऊन शासन झाले पाहिजे व त्यांच्यावर शासकीय गुन्हे दाखल झाले पाहिजेत व पात्र लाभार्थ्यांना त्यांचें अनुदान त्वरीत मिळावे या मागणीसाठी आज पासुन उपोषण सुरु केले आहे. या उपोषणात बलकुवा गावातील नागरीक व डॉ.सरोज पाटील यांनी सुरुवात केली असुन त्यांच्या सोबत माधव फुलचंद दोरीक,विश्राम रावण पाटील,आधार दशरथ कोळी,आप्ता सखाराम शिरसाठ,हिमंत वामन पाटील,शांताराम बुधा पाटील,सुदाम धोंडू पाटील इ. गावकर्‍यांनी सहभाग घेतला आहे. काय आहे.

118 पैकी 8 गावांनाच निधी
तालुक्यात 118 ग्रामपंचायती असतांना फक्त 8 गांवानांच हा निधी का देण्यात आला. हे 8 गावाचं सरपंच व ग्रामसेवक हे अधिक जवळचे होते का ? या कामात टक्केवारीचा खेळ झाला का ? असे अनेक प्रश्‍नचिन्ह निर्माण झालेत. या बाबत माहिती अधिकारतुन माहिती घेऊन चौकशी झाली असता संबधित ग्रामसेवकांवर 18 लाख रु.चा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला. शिवाय चौकशीत शासनाने निर्धारीत केलेल्या होय नाही च्या यादीत सुध्दा पुर्वी शौचालय असलेल्यांना सुध्दा अनुदान विरतीत करण्याचा प्रक़ार समोर आला. व प्राप्त लाभार्थ्यांनला सुध्दा अनुदान वितरीत झाले असे दाखवुन रक्कम खर्च करण्यात आली. त्यामुळे शेकडो लाभार्थी लभपासुन वंचित रहिले. व अनुदानात भ्रष्ट्राचार करण्यात आला. याबाबत सबंधित ग्रामसेवकास तात्तकाळ निलंबीत करण्यात आले मात्र रक्कम वसुली व गुन्हे दाखल करण्याबाबत पाठपुराव करुन देखिल कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. विशेष म्हणजे या प्रक़रणात 372 लभार्थ्यांचे प्रस्ताव ऑनलाईल दिसत असुन यापैकी कोणताही प्रस्ताव पंचायत समिती ग्रामपंचायत विभागास प्राप्त झालेले नाही. त्यामुळे हे प्रस्ताव ऑनलाईल कसे आले ? व निधी कसा विरतीत झाला या बाबंत साशंकता आहे . शिवाय या प्रकरणातील प्रमुख सुत्रधार ज्यांनी नियमबाह्य अग्रीम निधी मंजुर केला ते गट विकास अधिकारी. विस्तार अधिकारी यांची कोणतीही चौकशी न झाल्यामुळे खरे दोषी आज ही मोकाट आहेत.

बलकुवा शौचालय घोटाळा
स्वच्छ भारत अभियानअंतर्गत लोकांना प्रोत्साहीत करण्यासाठी शासनाने 10 टक्के अग्रीम निधी देण्याचे आदेश जारी केले होते. शिवाय अनुदान आ.टी.जी.एस.किंवा धनादेशाने लाभार्थ्यांच्या बँंक खात्यावर जमा होणे अनिवार्य होते. या योजनेत शिरपूर पंचायत समितीने तालुक्यातील 8 गावांना अग्रीम निधी मंजुर केला. यात सर्वाधिक अग्रीम निधी हा कुवे व बलकुवे यागावांसाठी रक्म रु. 64 लाख वितरीत केला. या साठी योग्य ते प्रस्ताव व मागणी नसतांना देखिल 100 टक्के नियम बाह्य निधी वितरीत करण्याचे काम पंचायत समिती अधिकार्‍यांनी केले. निधी वितरीत झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी काय झाली या कडे दुर्लक्ष करण्यात आले.