शिरपूर। सर्वोच्य न्यायालयाने शहरातील 500 किमी अंतरावरील बियर बार, वाईन शॉप बंद केल्याचे आदेश दिले. त्याची अमंलबजावणीही होतांना दिसत असली तरी शिरपूर तालुक्यात बनावट दारूचा महापूर वाहतच आहे. गेल्या महिन्याभरात दोन वेळा शिरपूर पोलीसांनी बनावट दारू पकडण्याची कारवाई केली असून लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.
संशयावरून पोलीसांनी केली तपासणी
मात्र या बनावट दारूच्या निर्यातीस पायबंद लावण्यास शिरपूर पोलीस प्रशासन अयशस्वी ठरत असल्याचे चित्र आहे. दरम्यान 7 रोजी खर्दे उंटावद मार्गे जाणार्या एका मालवाहू गाडीतून लाखो रूपयांची बनावट दारू जप्त करण्याची कारवाई शिरपूर पोलीसांनी केली. याबाबत सविस्तर माहिती अशी की शिरपूर पोलीसांना मिळालेल्या गोपनिय माहितीनूसार शहरातून जाणार्या उंटावद खर्दे रस्त्यावर सापडा रचला. दरम्यान या रस्त्यावरून गाडी क्र.एम.एच.18 एए 2825 ही मालवाहू छोटा हत्ती गाडी जात असतांना पोलीसांना संशय आल्याने गाडीची तपासणी केली. यावेळी गाडीत मुरमुर्यांच्या गोणींखाली देशी,विदेशी बनावट दारू भरलेली असल्याचे लक्षात आले. दरम्यान दारूसह गाडी असा 3 लाख 7 हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला असून एकास अटक करण्यात आली आहे. हि कारवाई पोसई व्हि.एस.आटोळे,पोकॉ पी बी बागले,पोकॉ.लक्ष्मीकांत टाकणे आदींनी केली.