शिरपूर पोलीसांकडून घरफोड्या करणार्‍या अट्टल गुन्हेरास अटक

0

शिरपूर । शहर आणि परिसरात घरफोड्या करणार्‍या अट्टल चोराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याचा साथीदार मात्र फरार झाला आहे. पोलिसांच्या कोठडीत असलेल्या या चोरांने जवळपास सव्वा लाखांचा घरफोडीचा माल पोलिसांना काढून दिला आहे. शिरपूर शहर परिसरात घरफोड्यांच्या घटनांमुळे रहिवाशी हैराण झाले होते. त्यामुळे पोलसांनीखबर्‍यांमार्फत चोरट्यांची कुंडली जमवीली. गुप्त माहितीच्या आधारे देविदास उर्फ देवाभगवान मोरे (वय 28) रा. धांदरणे ता. शिंदखेडा ह.मु. फार्मसी कॉलेजच्यापुढे करवंद रोड, शिरपूर याला अटक केली. त्याचा साथीदार रतन बारकू भिल रा. नरडाणा हा मात्र फरार आहे.

29 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
जितेंद्र नारायणदास सिंघानी रा. नवकारनगर शिरपूर यांच्याकडे झालेल्या घरफोडी प्रकरणी त्याने 29 हजारांचा मुद्देमाल काढून दिला. पोलिस कोठडीतील काळात त्याने शिरपूर शहर आणि परिसरात घरफोडी केलेल्या ठिकाणांहून चोरलेला मालही पोलिसांना काढून दिला. त्यामध्ये 4 टीव्ही, दोन पाण्याच्या मोटारी, मोबाईल, बॅटरी यांचा समावेश आहे. पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पानसरे, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय सानप, पीएसआय गुजर, वाघ, किरण बर्गे आणि पोलिस पथकाने ही कारवाई केली आहे.