शिरपूर । शहर व तालुक्यात मोटार सायकल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याला आळा बसविण्यासाठी पोलीसांनी देखील यंत्रणा कामाला लावली आहे. त्यातच पथकाने दोघा संशयितांकडून सुमारे 70 हजार रूपये किंमतीच्या दोन मोटार सायकली जप्त केल्या. आत्तापर्यंत या पथकाने वेगवेगळ्या संशयितांकडून 130 मोटार सायकली जप्त केल्या 29आहेत.
पीएसआय विजय आटोळेंच्या पथकाची कारवाई
शहरात मोटार सायकल चोरांचा सुळसुळाट झाल्याने पोलिस अधिक्षक एस.चैतन्या, अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उपविभागीय अधिकारी रफिक शेख, पोलिस निरीक्षक दत्तात्रय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय.विजय आटोळे, पो.हे.का.राजन दुसाणे, पो.ना. अकील पठाण, पो.कॉ.लक्ष्मीकांत टाकणे, प्रशांत बागले यांनी मिळालेल्या माहितीवरून चेतन बुवा व हर्षल गोसावी या दोघांकडून शिरपूर शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या मोटार सायकल चोरीच्या दोन गुन्ह्यातील हिरो होंडा कंपनीच्या 70 हजार रूपये किंमतीच्या दोन मोटार सायकल जप्त केल्यात. शोध पथकाने त्यापूर्वी देखील शहरात व तालुक्यात धडक मोहिम राबवून अनेक मोटार सायकल चोरींचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. भविष्यात देखील अशाच प्रकारचे काम करण्याचे पथकातील सदस्य लक्ष्मीकांत टाकणे यांनी दैनिक जनशक्तीशी बोलतांना सांगितले.