शिरपूर । येथील पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या सुक्ष्मजीवशास्त्र व जैवतंत्रज्ञान विभागातर्फे मंगळवार 9 जानेवारीला, 17व्या राज्यस्तरीय मायक्रोबायो ऑलिम्पियाड चाचणीचे आयोजित करण्यात आलेली आहे. स्पर्धेचे यंदा 17वे वर्ष असून पहिल्या टप्प्यात 9 जानेवारीला राज्यस्तरावर प्रवेश परीक्षा होणार आहे. त्यात एकूण 77 महाविद्यालयतील 3556 विद्यार्थी सहभागी झाले आहेत. आज मुंबई, ठाणे, भिवंडी, कल्याण, वाशी, उल्हासनगर, गोरेगाव, अकोला, चिखली, अंबाजोगाई, पुणे, नाशिक, बल्लारपूर, सोलापूर, पुलगाव, शिरपूर, लातूर, उदगीर, नगर, पनवेल, कराड, शेगाव, लोणी, कोपरगाव, जालना, औरंगाबाद अहमदनगर, अंबड, अमळनेर, देऊळगावराजा, लाखनि, लखन्दूर (भंडारा), बारामती, बीड, हिंगोली, धुळे, नंदुरबार, परभणी, शहादा, वर्धा, चालीसगाव, सटाना, कोल्हापूर आदी महाविद्यालयांत मायक्रोबायो ऑलिम्पियाड चाचणी परीक्षा होणार आहे.
चाचणी परीक्षेत यशस्वी झालेल्या महाविद्यालयांच्या संघासाठी 27 जानेवारीला अंतिम मायक्रोबायोऑलिम्पियाड स्पर्धा आर. सी. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, शिरपूर येथे अयोजित करण्यात आलेली आहे. निवडक संघ 26 जानेवारीला शिरपूरला दाखल होतील. 27 जानेवारी 2018 ला सकाळी एस.एम पटेल सभागृहात स्पर्धेची अंतीम फेरी आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी मायक्रोबायोलॉजिस्ट ऑफ इंडिया चे अध्यक्ष डॉ.ए.एम. देशमुख व राष्ट्रीय कोशिका संशोधन केंदाचे शास्त्रज्ञ डॉ. योगेश शौचे यांचे प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन लाभणार आहे, संस्थाध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, नगराध्यक्ष जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, संचालक डॉ.के.बी. पाटील, प्राचार्य डॉ.डी.आर. पाटील, उपप्राचार्य ए.जी.सोनवणे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होईल. विभाग प्रमुख डॉ.उल्हास पाटील, डॉ.रवींद्र पाटील, प्रा. संदीप पाटील, प्रा.नरेंद्र मोकाशे, प्रा.माधवी शिरसाठ, प्रा.महेश पाटील, डॉ. अश्विनी जी. पाटील, प्रा.लीना शिरसाठ, प्रा.निलेश वडनेरे, प्रा.शुभांगी पटेल, प्रा.अश्विनी सी.पाटील, प्रा.अमृता जोशी, प्रा.मोहीनी पाटील, प्रा. मृणाली ठाकरे संयोजन करीत आहेत.