शिरपूर येथील पटेल शाळेत वृक्षदिंडी

0

शिरपूर । येथील आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळेत आषाढी एकादशीनिमित्त वृक्षारोपण,ग्रंथदिंडी व वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले. नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल ,गटशिक्षणाधिकारी पी.झेड.रणदिवे, बांधकाम सभापती संगीता देवरे ,मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.उमेश शर्मा ,प्राचार्य पी.व्ही.पाटील, मुख्याध्यापक गणेश साळुंके, विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी. पाटील आदी उपस्थित होते. नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांनी वृक्षदिंडी व ग्रंथदिंडीचे पूजन करून औपचारिक उद्घाटन केले. गटशिक्षणाधिकारी पी.झेड रणदिवे यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले.