शिरपूर। शिरपूर येथील पां.बा.मा.म्यु.हायस्कुल मधील 1992 च्या माजी विद्याथ्यारचा स्नेह मेळावा नुकताच झाला. 1992 च्या माजी सर्व विद्यार्थी व विद्यार्थींनींचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून शाळेचे शिक्षक ज.मो.वाणी, मु.गो.स्वर्गे, ओ.एस.जाधव उपस्थित होते. सकाळी 11 वाजता कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. कार्यक्रमास सुरवात करतांना प्रास्ताविक शाळेचे माजी विद्यार्थी नंदलाल बाविस्कर यांने केले. यात त्याने आपण आज 25 वर्षानंतर याच वर्गात आपल्या गुरुजनांसोबत आपण हा कार्यक्रम घेत आहोत अशी सुरवात करुन माजी विद्यार्थ्यांची ओळख करुन दिली.
सुख-दुःखात सहभागाची ग्वाही
ओ.एस.जाधव सर यांनी आपल्या भाषणात शिक्षक विद्यार्थ्यांना कसा घडवतो व त्यास कशाप्रकारे शिक्षण देवू शकतो यावर प्रकाशझोत टाकत एक सुंदर असे गीत सादर केले. त्यानंतर सर्वांनी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. व सायंकाळी सर्व एकमेकांचा निरोप घेत प्रत्येकांनी आपण एकमेकांचा सुख-दुख:त सहभागी व्हायचे आश्वासन देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नंदलाल बाविस्कर तर आभार पंकज मिठभाकरे याने मानले.
भावी वाटचालीस शुभेच्छा
अध्यक्षिय भाषणाला उत्तर देतांना मु.गो.स्वर्गे सरांनी विद्यार्थी व शिक्षक यांचे नाते कसे असते यावर प्रकाश झोत टाकत सर्व माजी विद्यार्थ्यांना आपल्या भावी वाटचालींना शुभेच्छा दिल्यात. माजी विद्यार्थी पंकज मिठभाकरे याने घरची परीस्थीती अत्यंत गरीबीची असतांना सुध्दा सायकोलॉजी विषयात पी.एच.डी.करत आज तो पुणे शहरात गरीब मुकबधीर विद्यार्थ्यांना शिकवून ज्ञान देण्याचे काम करीत आहे असे सांगितले.
शिक्षकांबद्दल कृतज्ञता सुख-दुःखात सहभागाची ग्वाही