शिरपूर । एप्रिल महिना म्हटल्यावर कडाक्याचे उनाचे चटके लागत असल्याचे दृश्य पाहून येथील भारतीय जैन संघटनेचे सचिव राजेंद्र पारख यांनी शिरपूर शहरातील शनिमंदिर परिसरात गरीब वसाहत आहे. त्या वसाहतीत जाऊन राजेंद्र पारख यांनी दिडशे ते दोनशे अनवाणी फिरणार्या मुलांना नुकतेच पादत्राणे वाटप केले. यावेळी मुलांना मिळालेल्या पादत्राणा कडे कुतूहलाने पाहत होते. शनिमंदिर परिसरातले मुले अनवाणी भरकटत असल्याचे पाहून पारख यांनी विशाल बागरेचा , योगेश संचेती , संदीप मुनोत , आतिश शेठीया यांच्याशी चर्चा केली असता यासर्वांनी होकार दिला व पादत्राणे देण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्रमानंतर कधीच चपलेचा वापर न केलेल्या या गरीब मुलांना पादत्राणाचे कमालीचे कुतूहल वाटत होते.
मुलभूत सुविधांपासून वंचीत
शनिमंदिर परिसरात कष्टकरी वर्ग राहतो सकाळी उठल्यावर मजूरी व हमालीसाठी कामाला जातात. यातून मिळालेल्या पैंशातून कुटुंबातील सदस्यांचा उदरनिर्वाह भागवतात. बाकीच्या मुलभूत गोष्टींकडे कुटूंबाचे दुर्लक्ष राहत असल्याने शाळेचा विषयच राहणार नाही. अशा कुटुंबांना शालेय साहित्य आणणे कठीण असताना अशा मुलांना पादत्राणे कुठून आणणार असा कठीण प्रश्न कुटुंबातील प्रमुखाला सतावतो. या परिसरातले बरीचशी मुले अनवाणी फिरताना दिसतात. हे दृश्य पाहून पारख या दानशूर व्यक्तीने दिडशे ते दोनशे पादत्राणे वाटप केले.
दिशा देण्याची गरज
हनुमान जयंतीच्या चांगल्या दिवशी शनिमंदिर परिसरात जाऊन पादत्राणे वाटप करण्यात आले. चप्पलांचे वितरण झाल्यावर मुल अतिशय कौतुकाने चप्पलांची पाहणी करीत होते. गरीब वसाहतीतील मुलांना दिशा देण्याची गरज असल्याचे पारख सांगतात. त्यांच्या शालेय गरजा वेळेवर पूर्ण केल्या नाही तर ते घरच्या साधारण परिस्थिती मुळे शाळेकडे पाठ फिरवतात असे त्यांनी पारेख यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाने लक्ष द्यावे
या मुलांचे पालक कष्टकरी असल्याने अशा कुटूबाला दररोज जगण्याची भ्रांत असते. अशा गरीब मुलांकडे प्रशासनाने लक्ष पुरविले तर ही गरीब मुले उद्याचे भारताचे भविष्य घडविण्यात अग्रेसर राहतील असा विश्वास पारख यांनी केला यामुळे हा उपक्रम राबविण्यात आला त्यांचा या उपक्रमाचे गरीब मुलांच्या पालकांनी कौतुक केले यावेळी बळसाणे येथील पत्रकार गणेश जैन , राजेंद्र पारख यांच्या हस्ते पादत्राणे वाटप करण्यात आले या उपक्रमाचे समाजाने कौतुक केले