शिरपूर येथे एकलव्य संघटनेतर्फे मिरवणुकीचे आयोजन

0

शिरपूर । शिरपूर तालुका एकलव्य् संघटना व भिल समाज यांच्या वतीने अनेक मान्य्वरांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता विश्व् आदिवासी गौरव दिन अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येऊन शिरपूर शहरातून भव्य् शोभा यात्रा व गौरव रॅली काढण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिरपूर टेक्सटाईल पार्कचे चेअरमन तथा नगरसेवक तपनभाई पटेल, शिरपूर मर्चंट बँकेचे चेअरमन प्रसन्न् जैन व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.

उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांची प्रमुख उपस्थिती
सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वीर एकलव्य, क्रांतीवीर खाज्या नाईक, टंटया भिल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमास प्रियदर्शिनी सहकारी सूतगिरणीचे चेअरमन तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, शिरपूर टेक्सटाईल पार्कचे चेअरमन तथा नगरसेवक तपनभाई पटेल, शिरपूर मर्चंट बँकेचे चेअरमन प्रसन्न् जैन, काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुभाष कुलकर्णी, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष देवेंद्र राजपूत, नगरसेवक गणेश् सावळे, नगरसेवक पिंटू शिरसाठ, सुरेश अहिरे, पिंटू भिल, सुनिल मोरे, गुलाबराव मालचे, माजी पं.स.सदस्य् मनोज सोनवणे, नाना भिल, डॉ.धृव भिल, माजी सरपंच सरुबाई भिल, विनोद महाले, भूषण मोरे, अशोक ठाकरे, संदीप मालचे, सतिलाल मोरे, बंटी मोरे, राजेंद्र ठाकरे, रामसिंग सोनवणे, समाधान ठाकरे, दशरथ भिल, मनसाराम भिल, संजय भिल, संभाजी भिल, ईश्व्र मोरे, प्रविण भिल, तुकाराम भिल, भगवान भिल, बजरंग भिल, सुनिल जैन, तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, भिल समाजातील महिला, पुरुष, युवक, युवती मोठया संख्येने उपस्थित होते.