शिरपूर येथे चार लाखांचा गुटखा जप्त ; दोघांना घेतले ताब्यात

0

शिरपूर । अप्पर पोलीस अधिक्षक विवेक पानसरे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे विशेष पथकाने बुधवारी रात्री शिरपूर शहराजनजीक चोपडा फाट्यावर वाहनातून होणारी गुटखा तस्करी उघडकीस आणली. अप्पर पोलीस अधिक्षक विवेक पानसरे यांना गुटखा तस्करी होत असल्याची माहिती मिळाल्यावर उपनिरीक्षक शिंदे यांनी हे.कॉ.प्रदिप सोनवणे, पो.ना.नितीन पाटील, पो.कॉ.मुकेश जाधव समिर पाटील यांच्या पथकाने शिरपूर-सेंधवा रोडवरील चोपडा फाटा येथे पाळत ठेवली. संशयित एम.एच.18/एजे-7521 ही मारुती अल्टो 800 ही कार रात्री 9.30 च्या सुमारास त्या ठिकाणी आली असता त्यात विमल पान गुटखा व तंबाखुचासाठा आढळून आला. पोलिसांनी वाहनासह हा साठा जप्त केला असून वाहनाची किंमत 3 लाख 50 हजार व 48 हजार 780 रुपयांचा गुटखा मिळून 3 लाख 98 हजार 787 रुपयांचा ऐवज आहे. याप्रकरणी वाहनचालक रायभान राजेंद्र राजपूत (24) व गणेश दरबारसिंग राजपूत (27) दोघे रा. भाटपूरा, ता.शिरपूर यांना ताब्यात घेतले आहे.