शिरपूर । भारतीय नागरिक म्हणून चीनला प्रत्युत्तर देण्याचे कर्तव्य असतांना चीनी वस्तुंवर संपूर्ण बहिष्कार केला पाहिजे. रोजच्या उपयोगातील असंख्य वस्तुंच्या माध्यमातून चीन आपल्या घरात घुसला आहे. इलेक्ट्रॉनिक्स वस्तु, फर्निचर, मोबाईल, खेळणी, पाय पुसणे, राख्या, देवदेवतांच्या मूर्ती, आकाशकंदिल, फटाके, पणत्या, भेटवस्तुंतील असंख्य प्रकार तसेच विजेची शेकडो उपकरणे, मोठमोठी यंत्रे, इलेक्ट्रीक ट्रान्समीटर, विद्युत निर्मितीसाठी लागणारी सामुग्री, टेलिफोन एक्स्चेंजसाठी लागणारी उपकरणे अशा कितीतरी वस्तु चीनमधून भारतीय बाजारपेठेत दाखल होत आहेत. लहान मुलांच्या खेळण्यांमध्ये निकृष्ट दर्जांच्या रसायनांचा वापर करुन चीन भारतीयांच्या आरोग्याशीच खेळत आहे. चीनी मालावर बहिष्कार टाकणे गरजेचे असून शिरपूर येथे सोमवारी 28 रोजी बाबुराव वैद्य मार्केटपासून जनजागृती रॅली काढण्यात आली. ‘स्वदेशी अपनाओ देश बचाओ’चा नारा देत तहसिलदार महेश शेलार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी चीनी वस्तु खरेदी न करण्याचा आग्रह करावा असे आवाहन करण्यात आले.