शिरपूर येथे पटेल विद्यालयात गणित प्रदर्शन उत्साहात

0

शिरपूर : शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालयात शालेय गणित प्रदर्शन संपन्न झाले असून या प्रदर्शनात नवनिर्माण या गणित स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.उमेश शर्मा यांच्या हस्ते शालेय गणित प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
विद्यार्थी व शिक्षकांसाठी अतिशय उपयुक्त अशा अनेक गणितीय साहित्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात डॉ.उमेश शर्मा यांच्याहस्ते नवनिर्माण या गणित स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी टीचर्स रिसोर्स सेंटरचे गणित विषयाचे तज्ञ मार्गदर्शक अमोल परब, आर.सी.पटेल विद्यालयाचे प्राचार्य पी.व्ही.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

नवनविन संकल्पना राबविण्यात आले आहे
गणित प्रदर्शनात इ.5 वी ते इ.7 वी पर्यंतच्या गटातून 39 व इ.8 वी ते इ. 10 वी पर्यंतच्या गटातून 97 असे एकूण 136 गणिती उपकरणांची मांडणी करण्यात आली होती. संस्थेत कृतियुक्त अध्ययन व अध्यापनावर भर देण्यात येत असून प्रत्येक विद्यार्थ्याला गणिताची आवड निर्माण व्हावी यासाठी संस्थेचे अध्यक्ष माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सीईओ डॉ.उमेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली टीआरसी चे अमोल परब यांचे विशेष प्रयत्न सुरु आहेत. टीआरसी स्थापनेपासून अमोल परब यांच्या कल्पनेनुसार प्रत्येकाला गणित दिसले पाहिजे. ही संकल्पना राबविण्यात येत आहे. गणित विषय शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी गणिती उपकरण कसे तयार करावे, त्याचा उपयोग कसा करावा गणित प्रदर्शनात अमोल परब यांच्या द्वारे मार्गदर्शन करण्यात आले. दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर नेमका कसा करावा देखील खास मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांची संशोधन वृत्ती वाढण्यासाठी, गणितात आवड निर्माण व्हावी, गणितातील गंमतीजमती समजाव्यात यासाठी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.

विद्यार्थ्यांना योग्य बक्षिस
प्राचार्य पी.व्ही.पाटील यांनी आर.सी.पटेल विद्यालयात गणित व इंग्रजी विषयात 100 गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांसाठी बक्षिस योजना सुरु केली आहे. शाळेत प्राचार्य पी.व्ही.पाटील, पर्यवेक्षक ए.एच.जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गणित छंद मंडळ देखील स्थापन करण्यात आली आहे. सूत्रसंचलन एन.ई.चौधरी यांनी केले. आभार सचिन गाडीलोहार यांनी मानले. प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या सर्व गणित शिक्षकांनी परीश्रम घेतले.