शिरपूर । येथील आर. सी. पटेल फार्मसी मध्ये फार्मासिस्ट नोंदणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. आर. सी. पटेल औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय व महाराष्ट्र राज्य औषधव्यवसाय परिषद, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा फार्मासिस्ट रेजिस्ट्रेशन कॅम्प आयोजित केला होता. या दोन दिवसीय कॅम्प मध्ये सुमारे 750 (सातशे पन्नास) विद्यार्थ्यांनी फार्मासिस्ट म्हणून नोंदणी केली. तसेच काही अन्य फार्मसी व्यवसायिकानीं नोंदणी दाखल्याचे नूतनीकरण केले.
मुंबईचे सचिन ब्राह्मणकर, लक्ष्मण गावडे व पथक यांच्या टीम सोबत महाविद्यालयाचे बी. टेक (कॉस्मेटिक्स)चे विभाग प्रमुख प्राध्यापक मनोज गिरासे, गोविंदा भंडारी, प्रशांत चौधरी, मंगेश घोडके, विशाल गुरुमुखी यांनी काम बघितले. सदर कॅम्प सोबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय सुराणा, सचिन ब्राह्मणकर, लक्ष्मण गावडे व पथक यांनी वृक्षरोपण केले. कॅम्पचे समन्वयक व व्यवस्थापनाचे काम डॉ. अनिल टाटिया व डी. फार्मसी प्राचार्य डॉ. नितीन हसवानी यांनी केले. आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुराणा, उप-प्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर, यांचे मार्गदर्शन लाभले.