शिरपूर येथे बंद घरात लाखोंची घरफोडी

शिरपूर – शहरातील शंकर पांडू माळी नगर मधील मुलाच्या कॅन्सरच्या उपचारासाठी मुंबईला गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरात रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी हजारो रुपयांच्या सोने चांदीच्या दागिन्यांसह लाखोंचा मुद्देमाल चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरपूर शहरातील शंकर पांडू माळी नगर मधील सखुबाई नागोसींग जमादार यांच्या मुलगा मुकेश यांना कॅन्सर झाल्याने ते लहान मुलासह उपचारासाठी 6 नोव्हेंबर पासून घर बंद करून गेले होते. दरम्यान १७ नोव्हेंबर रोजी सकाळी शेजारील नवनाथ काशिनाथ जमादार यांनी फोनवरून घराचा दरवाजा उघडा असल्याची माहीती दिल्याने ते 18 नोव्हेंबर रोजी परत आले. घराची पाहणी केली असता घराच्या दरवाज्याच्या कडी कोंडा तोडून कपाटातील 70 हजार रोख व 95 हजार रुपये
किमतीचे 58 ग्राम सोन्याचे व 4 हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने असे एकूण 1 लाख 69 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी 6 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर दरम्यान चोरून नेल्याची सखुबाई नागोसींग जमादार वय ५५ रा.६२ शंकर पांडू माळी नगर, शकुंतला लॉन्सचे मागे शिरपूर यांनी गुरुवारी १८ नोव्हेंबर रोजी दुपारी फिर्याद दाखल केली. दाखल फिर्यादी वरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पीएसआय किरण बा-हे तपास करीत आहेत.

चोरीस गेलेल्या मुद्देमाल यमध्ये 30 हजार रुपये किमतीची दोन तोळ्याचे सोन्याचा गोफ, 10 हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम सोन्याचे कानातील काप,10 हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील तोंगल,20हजार रुपये किमतीची सोन्याची दीड तोळे वजनाची मंगलपोत,10 हजार रुपये किमतीची सोन्याची 6 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, लहान बाळाच्या 3 ग्रॅम वजनाच्या 6 अंगठ्या, 3 हजार रुपये किमतीच्या सोन्याचा 2 ग्रॅम वजनाच्या तुकडा, दोन हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र तील लहान वाट्या,2 हजार रुपये किमतीचे चांदीच्या पायातील साखळ्या 2 हजार रुपये किमतीच्या चांदीच्या पायातील बोटातील वेले व 70 हजार रुपये रोख असा मुद्देमाल गेला