शिरपूर । धुळे जिल्ह्यात अवैध धंद्यांना उत आले आहे. सोमवारी 19 रोजी जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात असलेल्या सांगवी गावालगत असलेल्या एका ढाब्याजवळ तीन टँकरमधून मद्य बनविण्याचे रसायन जप्त करण्यात आले. 62 लाख 62 हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल यावेळी जप्त करण्यात आले. 3 टँकरसह तीन पीकअप वाहनातून रसायनाची वाहतूक करण्यात येत होते.
याबाबत सांगवी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण खेडकर हे पोलीस उपनिरीक्षक जी.एस.पाटील, हवालदार महेंद्र वानखेडे, संजय देवरे, संजीव जाधव, लक्ष्मीकांत टाकणे, गोविंद कोळी, योगेश मोरे हे महामार्गावर गस्ती घालत होते. त्यांच्या लक्षात ही वाहने आल्यानंतर त्यांनी कारवाई केली.
पाचपैकी चार आरोपी ताब्यात; एक फरार
सांगवीजवळील नमोश्री पेट्रोल पंपासमोर टँकर क्रमांक पी.बी.11 सीबी-7402 वरील वाहन चालक याकुब रइसुद्दीन खान (22) उत्तर प्रदेश येथील सुनपुराकला येथील रहिवाशी, टँकर क्रमांक युपी-15 बीटी 3606 वरील चालक अनीस अहमद अजीम अहमद बलबीर विहार, किराणी सुलेमान दिल्ली, तीसरा टँकर क्रमांक पी.बी.-11 ए.वाय-9202 चालक हेमंत विक्रम पाटील सांगवी (शिपूर), देवा दयाराम भील पळासनेर (शिरपूर) या पाच जणांपैकी चार जणांना ताब्यात घेण्यात आल असून जेरबंद करण्यात आले आहे. यातुन एकाने पळ काढली. हेमंत पाटील व देवा भील यांच्याकडून टँकरचे सील तोडून रसायने ड्रममध्ये भरण्यात आले. कंपनीचा विश्वासघात करुन फसवणुक केल्याप्रकरणी पोलीस अधिकारी खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सांगवी तालुका पोलीस ठाण्यात भादवी कलम 420, 407, 120 (ब) व महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम 65 (अ), (ई) प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे