शिरपूर येथे महिला मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

0

शिरपूर। शिरपूर येथे जागतिक महिलादिनाच्या पार्श्वभूमीवर मॅरेथॉन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न् झाल्या असून विविध वयोगटातील अनेक महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. आद्य गौड मारवाडी ब्राह्मण महिला मंडळ, अग्रवाल महिला मंडळ, लायनेस क्लब ऑफ शिरपूर, कुणबीपाटील महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यातआलेल्या मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन आर.सी.पटेल डी. एड. कॉलेज कॅम्पसजवळ शिरपूर-करवंदर स्त्यावर शिरपूरवर वाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा जयश्रीबेन अमरिशभाई पटेल यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.

मान्यवरांची होती उपस्थिती
याप्रसंगी कक्कुबेन पटेल, न.पा. बांधकामसभापती संगिता देवरे, नगरसेविका रेखा सोनार, नगरसेविका हेमलता गवळी,शिसाका संचालिका सुचिता पाटील,आद्य गौड मारवाडी ब्राह्मण महिला मंडळ अध्यक्षा रमा शर्मा, अग्रवाल महिला मंडळ अध्यक्षा दिपा अग्रवाल,लायनेसक्लब ऑफ शिरपूरच्या अध्यक्षा संध्या जैन, कुणबी पाटील महिला मंडळअध्यक्षा चित्रा पाटील, स्वाती जगदाळे, कल्पना जाधव, पौर्णिमा पाठक यांच्यासह अनेकमहिला मान्यवरयांची प्रमुख् उपस्थिती होती.स्पर्धेच्या आयोजनासाठी पोलिस रमेश माळी, क्रीडा शिक्षक मनोज पाटील, एस.डी.गुजर, दुष्यंत पाटील यांनी सहकार्य केले.

चार गटात घेण्यात आली धावण्याची स्पर्धा
शिरपूर करवंदरस्त्यावर चार गटातील महिला 2 कि.मी. अंतर धावल्या. विजयी स्पर्धकांना नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल यांच्या हस्ते ट्रॉफी व बक्षिस देवून गौरविण्यात आले. 18 ते 25 वयोगटात प्रथम राजश्री राजेंद्र भिल, द्वितीय करीश्मा अनंत बारी, तृतीय फरीदा सत्तार गिरासे, 25 ते 40 वयोगटात प्रथम पौर्णिमा विंचुरकर, द्वितीय मोनाली कृष्णकांत साळुंखे, तृतीय स्वाती मेहुल गुजराथी, 40 ते 50 वयोगटात प्रथम कविता बाविस्कर, द्वितीयविद्या पंडीत, तृतीय डॉ.भारती सिसोदे, 50 पेक्षाजास्त वयोगटात प्रथम रेखाअग्रवाल, द्वितीय हिरा टोकशा, तृतीय कोकीळा पाटील यांनी विजय प्राप्त केला.