शिरपूर येथे महेश भगवान नवमीनिमित्त विविध कार्यक्रम

0

शिरपूर। महेश नवमीनिमित्त शिरपूर येथील माहेश्वरी समाज व माहेश्वरी युवा संघटन यांच्यावतीने शनिवार 3 जून रोजी सकाळी महेश वंदना, आरती, भव्यरॅली, रक्तदान शिबीर यासहविविध कार्यक्रम संपन्न झाले.शहरातील श्रीदत्त मंदिर, मारवाडी गल्ली परिसरातून पाताळेश्वर मंदिरापर्यंत भव्यस्वरुपात रॅली काढण्यात आली. रॅलीत सर्व समाजबांधव यांनी पांढरा ड्रेस, डोक्यावर पगडी व महिलांनी लालरंगाचे कपडे, साडी परीधान केले होते. पाताळेश्वर मंदिराच्या गॅलरीत महेश वंदना, आरती, रक्तदान शिबीर घेण्यात आले. रक्तदान शिबीरात अनेक समाजबांधव दात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.अशा विविध कार्यक्रमांनी समाजबांधवांनी महेश भगवान (शिवजी) यांची नवमी मोठया उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. दुपारी समाजातील गुणवंत मुले मुली, तसेच विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या समाजातील बंधूभगिनी यांचा सत्कार करण्यात आला.

रॅली, रक्तदान शिबीराचे आयोजन
रॅलीत माहेश्वरी समाजातील मिश्रीलाल राठी, लक्ष्मीनारायण भंडारी, चंपालाल काबरा, सुभाष झंवर, रमेश राठी, एकनाथ भंडारी यांच्यासह राजगोपाल भंडारी, कमलकिशोर भंडारी, सी.ए. विज यराठी, डॉ.कृष्णा राठी, डॉ.किशोर राठी, डॉ.सुभाष भंडारी, गोपाल भंडारी, डॉ.सतिष राठी, नंदकिशोर भंडारी, सतिष भंडारी,शिरपूर पिपल्स बँकेचे चेअरमन योगेश भंडारी, मनोज भंडारी, ओमप्रकाश भंडारी, राजेश भंडारी, सुनिल राठी, राजेंद्र भंडारी,सुनिलबिर्ला, डॉ. नलिनी किशोर राठी, कविता चंचल झंवर, अंशूल विजय भंडारी, कविता सचिन भंडारी, चंदन श्रेयस भंडारी यांच्यासह अबालवृद्धा सहभागी झाले होते. यशस्वीतेसाठी सी.ए. विजय गोपाल भंडारी, श्रीकेश राठी, सचिव गोविंदा भंडारी, सर्वेश श्रीनिवास राठी, मनिष बन्सीलाल गगराणी, सदस्य अंकुश गोपाल राठी, सचिन एकनाथ भंडारी, विनय गोपाल भंडारी, अतुल राजगोपाल भंडारी, राजेश लक्ष्मीनारायण कोठारी, आनंदबद्रीविशाल मुंदडा, स्वप्निल रामनारायण राठी, समाजबांधव आदींनी कामकाज पाहिले.