शिरपूर येथे लेफ्टनंट प्रमोद गिरासे यांचा सत्कार

0

राजपूत समाजातर्फे सत्काराचे आयोजन

शिरपूर । महाराष्ट्रातील अवघ्या राजपूत समाजाला गर्व व्हावा असे कर्तृत्व धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बळसाणे गावातील प्रमोद गिरासे ह्या युवकाने केला. वयाच्या फक्त २२ व्या वर्षी ’लेफ्टनंट’ पदी त्याची नुकतीच नियुक्ती झाली. वडील सुरत येथे हिरा घासायचे, घरची परिस्थिती अत्यंत बिकट, अश्या कठीण परिस्थितीतून प्रमोद याने यश संपादन केले.

सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांची होती उपस्थिती
शिरपूर तालुका राजपूत समाज नेहमीच समाजसन्माना साठी अग्रेसर असतो, प्रमोद यास अजून पुढे यश मिळावे, प्रेरणा मिळावी म्हणून गुरूवारी २१ सप्टेंबर २०१७ रोजी शिरपूर तालुका राजपूत समाजाच्या वतीने प्रमोद गिरासे यांचा आमोदा येथील विश्राम गृहात सत्कार करण्यात आला. यावेळी समाजाचे तोलामोलाचे मान्यवर, नगरसेवक उपस्थित होते. सत्कार करतांना शिरपूर पं.स. उपसभापती जगतसिंग राजपूत, शिवसेना तालुकाध्यक्ष भरतसिंग राजपूत, बोरगांव युवा काँग्रेसचे अध्यक्ष धनसिंग राजपूत, गोल्ड रिफायनरीचे एचआर मॅनेजर योगेंद्रसिंग सिसोदिया.