शिरपूर । आर.सी.पटेल मराठी प्राथमिक शाळा शिरपूर येथे शिक्षकांनी वर्गांची सजावट केली.शैक्षणिक वर्षांची सुरुवात होऊन दोन आठवडे झालेत. विद्यार्थ्याची नियमित उपस्थिती,नियमित अध्यापन,शैक्षणिक साहित्याचा नियमित वापर यांच्या जोडीला वर्ग देखील सुंदर असेल तर विद्यार्थी अध्ययनात रममाण होतात. घर, परिसर, शाळा, वर्ग या सर्व घटकांचा विद्यार्थी अध्ययनावर परिणाम होत असतो. शिक्षकांनी या गोष्टींचे भान ठेवून आपला वर्ग सुशोभित करण्याचे निश्चित केले.प्राथमिक शिक्षणात वर्गाच्या भिंती बोलक्या असल्या तर विद्यार्थी अध्ययनात रममाण होतात. याचाच विचार शिक्षकांनी केला. वर्गात विषयनिहाय उपयुक्त चार्ट, तक्ते, डिजिटल बॅनर, शब्द पट्ट्या आदी साहित्य स्व-खर्चाने तयार केले.वर्ग सजावट स्पर्धा दोन गटात घेण्यात आली.
अशी घेतली स्पर्धा
पहिला गट- इयत्ता 1 ली 2 री, दुसरा गट- 3री व 4. याप्रमाणे दोन गटातून झालेल्या स्पर्धेत गटनिहाय दोन क्रमांक काढण्यात आले. यात शिक्षकांनी यश संपादन केले.पहिला गट – प्रथम- महेंद्र भिकन माळी, द्वितीय- प्रकाश सुदाम ईशी, उत्तेजनार्थ- रेखा दिलीप माळी. दुसरा गट- प्रथम- सुभाष कायसिंग भिल, द्वितीय- गोपाल वसंत न्हावी, उत्तेजनार्थ- गजेंद्र पांडुरंग जाधव.स्पर्धा परीक्षण मुख्याध्यापक गणेश साळुंके व महेंद्र परदेशी यांनी केले.स्पर्धा संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उमेश शर्मा, विद्यालयाचे मुख्याध्यापक सी.डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.