शिरपूर। येथील अलंकार चित्र मंदिराच्या समोर असलेल्या स्वॉईन गेमवर अप्पर पोलिस अधिक्षक यांच्या विशेष पथकाने धाड टाकून 17 जणांना रंगेहात पकडले. याकारवाईत एक लाखाच्या मशिनासाह 11 हजार 420 रूपयांची रोकड जप्त करण्यात आली. शुक्रवार 9 जून रोजी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास अप्पर पोलिस अधिक्षक यांच्या विशेष पथकाने शहरातील अलंकार चित्र मंदिरसमोर असलेल्या कॉईन गेमवर धाड टाकली.
लाखाच्या मशिनसह 11 हजारांची रोकड जप्त
यावेळी अनिल गुलाब खैरणार, गाकूळ भिमराव पाटील, रामकृष्ण रमाकांत धोबी, नितेश सतीष ईशी, इरर्फान रहिमखान बागवान, बापू हिरामण अहिरे, रमेश लाबू पारधी, सोमनाथ सिताराम भिल, शंकर नाना भिल, पंकज मुलचंद माडोंले, अनंत प्रकाश महाले, महेश वसंत पाटील, दिलीप विनायक ईशी, अजय बाबुराव महाले, निलशे दिलीप पाटील, गणेश प्रकाश कावेरे, अमृत बुकन पारवा सर्व राहणार शिरपूर असे एकूण 10 जणांना हारजित जुगाराचा खेळ खेळतांना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईत 1 लाख रूपयांचे 5 कॉईन गेम मशिनसह 11 हजार 420 रूपये रोकड असे एकूण 1 लाख 11 हजार 420 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरूद्ध शिरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पानसरे यांच्यापथकातील नितीन पाटील, बी. जी. शिंदे, प्रदिप सोनवणे, मुकेश जाधव, समीर पाटील यांनी धाड टाकली. घटनास्थळी प्रभारी डीवायएसपी संजय सानप यांनी भेट दिली.