शिरपूर येथे १४ वर्षे खालील मुलींच्या फुटबॉल सामन्यांना प्रारंभ

0

शिरपूर : येथील आर.सी.पटेल फार्मसी कॉलेजच्या भव्य मैदानावर वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) अंतर्गत १४ वर्षे खालील मुलींच्या फुटबॉलच्या सामन्यांना मंगळवार दि. १४ फेब्रुवारी पासून प्रारंभ झाला. सामन्यांमध्ये अतिशय उत्सुकतेचे वातावरण दिसून येत आहे. सर्व खेळाडूंची व सोबत आलेल्या कोच व व्यवस्थापक यांची निवास, नाश्ता व जेवणाची अतिशय चांगली व्यवस्था करण्यात आली असून सर्वांनी खूपच आनंद व्यक्त केला आहे. या फुटबॉल सामन्यांचे उदघाटन अतुल भंडारी, जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सेक्रेटरी रईस काझी, संस्थेचे सीईओ डॉ. उमेश शर्मा, सचिन दायमा यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. १८ फेब्रुवारी रोजी समारोप होईल. महाराष्ट्रातील आठ विभागातील १८ जिल्हयांमधून मुलींचे फुटबॉल संघ शिरपूर येथे दाखल झाले आहेत.

१८ रोजी अंतिम सामने

प्रास्ताविकात जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सेक्रेटरी रईस काझी यांनी फुटबॉल सामन्यांच्या आयोजनाबाबत माहिती दिली. तसेचशिरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आमदार अमरिशभाई पटेल, आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्टचे अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी केलेल्या उत्कृष्ट आयोजनाबददलआभारमानले.सूत्रसंचलन राकेश साळुंखे यांनी केले. आभार एस.एस.जोशी यांनी मानले. हे सामने ड्रॉ पदधतीने दि.१८ फेब्रुवारी पर्यंत घेण्यात येत आहेत. शेवटच्या दिवशी दि. १८ रोजी अंतिम सामने खेळविण्यात येणार आहेत.

सोलापूरची अहमदनगरवर मात

पहिल्या दिवशी पहिला सामना सोलापूर व अहबदनगर या संघांमध्ये झाला. यांच्यात झालेल्या चुरशीच्या सामन्यात सोलापूर संघाने ३ गोल करुन अहमदनगर संघावर (२ गोल) मात केली व सामना जिंकला.रेफरी म्हणून शहाजी शिंदे, असिस्टंट रेफरी गौरव माने,असिस्टंट रेफरी संदीप कदम, ऑफीशिअल मनिष कोरजल यांनी काम पाहिले. दुस-या सामन्यात कोल्हापूर संघाने सातारा संघावर २ विरुदध ० अशी मात करुन सामना जिंकला.या सामन्यासाठी दिनकर म्हस्के हे रेफरी तर असिस्टंट रेफरी प्रदीप अलाट व मनिष कोरजल, ऑफिसिअल प्रविण कनोजिया होते. तिस-या सामन्यात बुलढाणा संघाने यवतमाळ संघावर १ विरुदध ० अशी मात करुन सामना खिशात घातला. ऋषिकेश हे रेफरी होते. चौथ्या सामन्यात मुंबई संघाने ठाणे संघावर ५ विरुदध १ असा सामना जिंकून आपले वर्चस्व सिदध केले.

अनेक संघंचा सहभाग

प्रविण कनोजिया हे रेफरी होते. पाचव्या सामन्यात नाशिक संघाने धुळे संघावर ३ विरुदध ० अशी मात करुन सामना जिंकला. गौाव माने हे रेफरी होते.या सर्व सामन्यांसाठी मॅच कमिशनर म्हणून तपन घोष, विफा ऑफीशिअल म्हणून भूषण पांगेकर, रेफरी ओंकार म्हस्केहे जबाबदारी सांभाळत आहेत. शिरपूर येथील आर.सी.पटेल फार्मसी कॉलेजच्या भव्य मैदानावर वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) अंतर्गत १४ वर्षे खालील मुलींच्या फुटबॉल सामन्यांसाठी मुंबई विभागातून मुंबई, पालघर, ठाणे, अमरावती विभागातून अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, औरंगाबाद विभागातून औरंगाबाद, परभणी, कोल्हापूर विभागातून कोल्हापूर, सातारा, पुणे विभागातून अहमदनगर, सोलापूर, पुणे, नाशिक विभागातून जळगाव, नाशिक, धुळे, लातूर विभागातून उस्मानाबाद, लातूर, नागपूर विभागातून नागपूर जिल्हयाचे फुटबॉलचे संघ शिरपूर येथे दाखल झाले आहेत.