शिरपूरमधील न्यायालय परिसरातील दोन बालके बेपत्ता

0

शिरपूर: शहरातील न्यायालयाच्या समोरील जनतानगरमधील परिसरातील दोन अल्पवयीन मुले काल शनिवारी दुपारपासून बेपत्ता झाली असून अपहरण झाल्याच्या संशयावरून परिसरात खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात अपहरण झालेल्या मुलांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील कोर्टासमोरील जनता नगर नाल्याजवळ राहणाऱ्या तुफान प्रल्हाद पावरा (32) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार ते पत्नी व आईसह राहतात. त्याला 7 वर्षीय मुलगी सुनंदा व 4 वर्षीय मुलगा साहिल आहत. ते 9 रोजी 11 वाजेच्या सुमारास घरासमोरील अंगणात खेळत होते. दरम्यान 11:30 वाजेच्या सुमारास दोन्ही मुले अंगणात आढळून आले नाही. त्यांचा सर्वत्र शोध घेतला असता ते रात्री उशिरापर्यंत मिळून आले नाहीत. त्यांचा अपहरण झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. याप्रकरणी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात अपहरनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पीएसआय सोनवणे करीत आहेत.