शिरपूर शहरात पुन्हा दोन कोरोना बाधित रुग्ण आढळले

0

शिरपूर: शहरात शुक्रवारी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. शहरातील वाल्मिक नगरातील ६० वर्षीय वृद्ध महिला कोरोना बाधित आढळून आली तर अंबिका नगरातील महिलेचाही तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात २५ जणांचे स्वब घेतले असून १० पेंडिंग असे ३५ पेंडिंग आहेत. आतापर्यंत तालुक्यात २३ रुग्ण आढळून आले असून त्यात शहरातील १७ कोरोना बाधीतांचा समावेश आहे.