शिरपूर । येथील शिरपूर शहादा राज्य मार्ग क्रमांक 4 वरील नगरपालिका हद्दीतील रस्त्याच्याकडेला असलेले अतिक्रमण काढण्यासाठी अतिक्रमणधारकांनी सहकार्य केल्यामुळे अतिक्रमण काढण्यात यश आले आहे. उपविभागीय अधिकारी शिरपूर यांच्या समवेत 3 एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत सुचनेनूसार नगरपालिका हद्दीतील शिरपूर शहादा रस्ता क्र.4 वरील अतिक्रमीत बांबुचे शेड्स, पत्र्याच्या टपर्या, दुकाने असे 59 अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. या अतिक्रमण निर्मुलन मोहिमेत सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.चे उपविभागीय अधिकारी विजय मंगळे, आर डी.नंदवालकर, एस.डी.पाटील, एम.बी.सोनवणे, शाखा अभियंता आर.एस.चौधरी, डी.एस.मोरे सहाय्यक अभियंता नरेश पाटील, ए.एम.जोशी, एस.आर माळी आदि अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. अतिक्रमण काढण्यासाठी डी.वाय.एस.पी शेख, पोलीस निरीक्षक, अनिल वडनेरे व पोलीस कर्मचार्यांचा चोख बंदोबस्त होता.