शिरपूर । शिक्षणासोबत खेळाचे महत्त्व जपत आपल्या तालक्यातुन विविध खेळात विद्यार्थी सहभाग घेत असतात व नेत्रदिपक कामगीरी करत असतात. अशीच भरीव कामगीरी शिरपूर तालुक्याच्या हॅन्डबॉल संघाने केली असुन त्यांनी राज्यस्तरीय स्तरावर जाऊन उत्कृष्ठ खेळ दाखवला आहे. महाराष्ट्र हॅन्डबॉल असोशिएशनच्या 34 वी सब ज्युनियर राज्यस्तरीय खुल्या हॅन्डबॉल स्पधेर्च आयोजन 1 ते 3 सष्टेंबर या काळात अहमदपुर जि.लातुर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत शिरपूर तालुक्यातुन आर.सी.पटेल विद्यालयाचे 9,सी.बी.एस.सी विद्यालय तांडे यांचे 6 व व्हि.व्हि.रंधे विद्यालयाचे 1 अश्या 15 वर्षे वयोगटाच्या स्पर्धेत भाग घेऊन आपला यशस्वी सहभाग नोंदवला. यास्पर्धेत सांगली संघ विजेता ठरला.
यांचे लाभले सहकार्य
या विद्यार्थ्यार्ध्यांना राज्सस्तारीय स्तरावर पोहोचविण्यासाठी प्रशिक्षक सचिन सिसोदिया,रोहित बागुल,सुमित विसावा,भुषण चव्हाण, हरीष सोनवणे धुळे जिल्हा हॅन्डबॉल असो.सचिव डॉ.नरेश बागल यांनी परिश्रम घेतले. आर.सी.पटेल एज्युकेशनल ट्रस्ट, एस.व्ही.के.एम. संस्थेच्या वतीने माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल, शिरपूरच्या नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष भुपेशभाई पटेल, शिरपूर टेक्स्टाईल पार्क चेअरमन तथा नगरसेवक तपनभाई पटेल, एस.व्ही.के.एम. स्पोर्टस कमिटी उपाध्यक्ष नविन शेट्टी, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, संस्थेचे वित्त अधिकारी नाटुसिंग गिरासे, क्रीडा विभाग प्रमुख प्रितेश पटेल, सीईओ डॉ.उमेश शर्मा सर्व संचालक, सर्व मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक व प्रशिक्षक यांनी कौतुक व मार्गदर्शन केले आहे.