शिरसाळा मारोती येथे 30 रोजी कीर्तन सोहळा

0

भुसावळ- महाराष्ट्र जनसंग्राम बहुजन लोकमंचच्या वतीने शनिवार, 30 जून रोजी बोदवड तालुक्यातील श्री क्षेत्र शिरसाळा मारोती येथील देवस्थानात भागवत कथाकार व शिवप्रवक्ते हभप.शिवदास महाराज राहणे यांचा सृश्राव्य कीर्तन, सत्कार व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जनसंग्राम बहुजन लोकमंचचे अध्यक्ष विवेक ठाकरे यांनी दर शनिवारी शिरसाळा मारोती नित्य दर्शनाचा संकल्प केला होता. या संकल्पवारीचा समारोप म्हणून येथे महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. त्यापूर्वी खेडी-पान्हेरी येथील भागवत धर्म विचार प्रचारक हभप शिवदास महाराज यांची सकाळी 10 ते 12 वाजता कीर्तनसेवा होईल. या कार्यक्रमात कांडवेल (ता.रावेर) येथील ग्रामस्थांची हतनूर लाभक्षेत्रात राहती घरे बाधीत झाली होती. या सर्व बाधीतांना मोबदला मिळण्याचे प्रकरण पाच वर्षांपासून थंडबस्त्यात होते. या प्रकल्पबाधीतांना मोबदला मिळवून देण्यासाठी जनसंग्राम संघटनेने यशस्वी पाठपुरावा केला होता. यासाठी ज्या-ज्या लोकांनी सहकार्य केले, अशा सर्वांचे ऋणनिर्देश व जाहीर सत्कार सुद्धा केला जाणार आहे.

जागृत मारोती शिरसाळा
जयश्री हनुमान मंदिर ट्रस्टच्या सभागृहात आयोजित या कार्यक्रमास जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहून कीर्तनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जनसंग्रामचे डी.टी.नेटके, यशवंत गाजरे, वाय.डी.पाटील, मिलिंद तायडे, बळीराम पाटील आदी संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.