शिरसोलीजवळ आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
अपघातांची मालिक सुरुच; प्रवास करणे झाले अवघड, रस्त्यांवरील खड्डे ठरताय जीवघेणे
जळगाव- पाचोरा रोडवरील शिरसोली जवळील महाजन हॉटेलनजीक मंगळवारी दुपारी साडेचार ते 5 वाजेच्या
सुमारास आयशरच्या धडकेत एक मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला आहे. दरम्यान, गेल्या काही
दिवसांपासून जिल्ह्यात अपघातांची मालिका सुरू आहे. पावसामुळे रस्ते व महामार्गावरील खड्ड्यांमध्ये वाढ
होत आहे. त्यामुळे प्रवास जीवघेणा ठरत आहे.
सोयगाव तालुक्यातील जंगलतांडा येथील मूळ रहिवासी व सध्या जळगाव शहरातील ढाकेवाडी परिसरातील दे
विदास कॉलनीमधील रहिवासी आणि सेंटींग कारागीर लालसिंग वलसिंग चव्हाण (वय 35) हा मोटारसायकलने जळगावहून पाचोर्याकडे जात होता. या वेळी पाचोर्याकडून जळगावकडे आयशर गाडी (क्र.एमएच 12 आरएन7599) ने एका गाडीला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात समोरील मोटारसायकलला जोरदार धडक दिली. यात मोटारसायकलस्वार लालसिंग चव्हाण जागीच ठार झाला. तर आयशर गाडीवरील चालक पसार झाला. अपघात झाल्याचे लक्षात येताच रस्त्यावरील इतर वाहनचालक व शिरसोली ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. मृताजवळील मोबाइलवरुन त्याच्या संपर्कातील व्यक्तींशी इतर नागरिकांनी संपर्क साधला. त्यामुळे मृत तरुणाची ओळख पटली. तसेच पोलिसांना कळताच त्यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत आयशर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते