शिरसोलीजवळ सापडला मृतदेह

0

जळगाव। शिरसोली गावानजीक मंगळवारी दुपारी अनोळखी इसमाचा मृतदेह सापडल्याची घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, मृतदेहाजवळ विषारी औषधाची बाटली मिळून आली.

शिरसोली गावाबाहेर दुपारी गावातील नागरिकांना एक अनोळखी इसम मृत अवस्थेत पडलेला मिळून आल्यानंतर त्यांनी लागलीच पोलिसांना संपर्क साधला. पोलिस निरीक्षक सुनिल कुराडे यांनी घटनास्थळी जावून पाहणी करत मृतदेह ताब्यात घेतला.