शिरसोलीत लाखाच्या दागिण्यांवर चोरट्यांचा डल्ला

Thieves raid on lacquer jewelery in Shirsoli जळगाव : खाजगी नोकरदाराच्या बंद घरातून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड मिळून एक लाखांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी सोमवार, 26 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता एमआयडीसी पोलिसात
अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
प्रभाकर आनंदा पाटील (53, रा.शिरसोली, जि.जळगाव) हे आपल्या परीवारासह वास्तव्याला असून खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. सोमवार, 26 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते दुपारी दोन वाजेच्या दरम्यान त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करीत सोन्याचे दागिने, चांदीचे कडे आणि 20 हजारांची रोकड असा एकूण एक लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. हा प्रकार घडल्यानंतर प्रभाकर पाटील यांनी लागलीच एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. तपास हवालदार जितेंद्र राठोड करीत आहे.