शिरसोली गावाजवळ दुचाकीला अपघात : चालकाविरोधात गुन्हा

जळगाव : शिरसोली गावाजवळील वळणावर दुचाकी घसरल्याने दुचाकी चालकासह अन्य एक जण जखमी झाला होता. या प्रकरणी दुचाकी चालकाविरोधात जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

एमआयडीसी पोलिसात गुन्हा
हारूण शेख मन्नोवर (51) आणि वसीम शेख अब्दुल रहेमान (दोन्ही रा.नागदुली, ता.एरंडोल) हे दोन्ही मिस्तरी काम करतात. 28 मार्च रोजी रात्री 9 वाजता दोघ कामावरून नागदुली जाण्यासाठी दुचाकी (एम.एच.10 डी.यू 1560) ने शिरसोली रस्त्याने जात होते. त्यावेळी दुचाकी वसीम शेख चालवित होता. शिरसोली गावाजवळील वळणावर अचानक वसीमचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी घसरली. या अपघातात दोघे जण जखमी होवून दुचाकीचे नुकसान झाले होते. दोघांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या घटनेप्रकरणी बुधवार, 6 एप्रिल रोजी रात्री हारूण शेख मुन्नोवर यांच्या फिर्यादीवरून वसीम शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक समाधान टहाकळे करीत आहे.