जळगाव – शिरसोली रस्त्यावरील कादरी पेट्रोल पंपासमोरून २ सप्टेंबरच्या रात्री ९.३० ते ३ सप्टेंबरच्या सकाळी ९.३० वाजेदरम्यान दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शनिवारी सायंकाळी ६.३७ वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बाळकृष्ण पुरुषोत्तम जोशी (वय-५३) यांची २५ हजार रुपये किंमतीची दुचाकी कादरी पेट्रोल पंपासमोरून चोरी झाली होती. या दुचाकीचा जोशी यांनी महिनाभर इतरत्र शोध घेतला मात्र दुचाकी मिळून न आल्याने त्यांनी शनिवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाचा तपास एएसआय प्रकाश निंबाळकर करत आहेत.